'या अल्लाह बस मौत दो..!', एम.सी.स्टॅनच्या नव्या पोस्टने चाहत्यांच्या जीवाला घोर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 01:45 PM2024-05-24T13:45:05+5:302024-05-24T13:46:26+5:30

एम.सी.स्टॅनच्या नवीन पोस्टने त्याच्या फॅन्सना जबर धक्का बसलाय. एम.सी.स्टॅनची पोस्ट नक्की काय आहे, जाणून घ्या (MC Stan)

bigg boss 16 winner mc stan new social media post for he demanding death to allah | 'या अल्लाह बस मौत दो..!', एम.सी.स्टॅनच्या नव्या पोस्टने चाहत्यांच्या जीवाला घोर

'या अल्लाह बस मौत दो..!', एम.सी.स्टॅनच्या नव्या पोस्टने चाहत्यांच्या जीवाला घोर

एम.सी.स्टॅन हा प्रसिद्ध रॅपर. एम.सी.स्टॅनने 'बिग बॉस 16' चं विजेतेपद मिळवून सर्वांना आपली दखल घ्यायला लावली. एम.सी.स्टॅनच्या गाण्यांचे जगभरात लाखो चाहते आहेत. स्टॅनने आतापर्यंत कपिल शर्मा, क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी यांच्यासोबत विविध माध्यमांत काम केलंय. स्टॅनने नुकतीच एक नवीन पोस्ट शेअर केलीय. यामुळे त्याच्या चाहत्यांना काळजी वाटली आहे. काय आहे ती नवीन पोस्ट?

एम.सी.स्टॅनच्या नवीन पोस्टने खळबळ

एम.सी.स्टॅन हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय असतो. स्टॅनच्या नव्या पोस्टने मात्र त्याच्या चाहत्यांमध्ये चिंताजनक वातावरण तयार झालंय. स्टॅनने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट लिहिलीय की.. 'या अल्लाह बस मौत दो', असं कॅप्शन लिहून स्टॅनने दुआ मागतानाचा इमोजी शेअर केलाय. स्टॅनच्या या पोस्टने चाहत्यांच्या जीवाला घोर लागला असून स्टॅन असं का म्हणाला असा सर्वांना प्रश्न पडलाय. 

एम.सी.स्टॅनच्या नवीन पोस्टनी चाहत्यांच्या जीवाला घोर

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एम.सी.स्टॅनची पोस्ट व्हायरल होताच चाहत्यांना एकच धक्का बसलाय. एम.सी.स्टॅनसोबत असं काय घडलं की त्याने थेट मरणाची मागणी केली असा प्रश्न युजर विचारत आहेत. 'भाई काय झालं', 'असं काही करु नकोस', 'स्वतःच्या फॅन्सचा विचार कर', 'आयुष्यात चढ - उतार येत असतात. पण मृत्यू हे कोणत्याही गोष्टीचं समाधान नाही', अशा प्रतिक्रिया देत चाहते एम.सी.स्टॅनला धीर देण्याचा प्रयत्न करत आहेत. आता स्टॅनने ही पोस्ट नक्की का केली, याचा खुलासा लवकरच होईल अशी सर्वांना आशा आहे.

Web Title: bigg boss 16 winner mc stan new social media post for he demanding death to allah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.