'धुरंधर'च्या पार्ट २बद्दल मोठी अपडेट; अभिनेता म्हणाला-"५० पट जास्त असणार ॲक्शन आणि मिस्ट्री"
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 16:14 IST2025-12-23T16:13:37+5:302025-12-23T16:14:17+5:30
Dhurandhar' part 2 : आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' हा चित्रपट २०२५ मधील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरला आहे. बॉक्स ऑफिसवर सर्व रेकॉर्ड मोडीत काढल्यानंतर आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची चर्चा रंगू लागली आहे.

'धुरंधर'च्या पार्ट २बद्दल मोठी अपडेट; अभिनेता म्हणाला-"५० पट जास्त असणार ॲक्शन आणि मिस्ट्री"
आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' हा चित्रपट २०२५ मधील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरला आहे. बॉक्स ऑफिसवर सर्व रेकॉर्ड मोडीत काढल्यानंतर आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची चर्चा रंगू लागली आहे. हा बहुप्रतिक्षित सीक्वल १९ मार्च २०२६ रोजी प्रदर्शित होणार असून, चित्रपटातील कलाकार नवीन कौशिक यांनी याबद्दल एक मोठी अपडेट दिली आहे.
'जस्ट टू फिल्मी'शी संवाद साधताना नवीन कौशिक म्हणाले, "तुम्ही पहिल्या भागात जी ॲक्शन, मिस्ट्री आणि मॅनिप्युलेशन पाहिलं आहे, त्याच्या ५० पट जास्त थरार तुम्हाला पार्ट २ मध्ये पाहायला मिळेल. मी हा चित्रपट बनताना पाहिला आहे, त्यामुळे मी आत्मविश्वासाने सांगू शकतो की हा अनुभव पहिल्या भागाच्या तुलनेत कित्येक पटीने मोठा असेल." यापूर्वी स्वतः रणवीर सिंगनेही पार्ट २ बाबत संकेत दिले होते. आपला सह-कलाकार दानिश पंडोर याच्या पोस्टवर कमेंट करताना रणवीर म्हणाला होता, "विचार करा जेव्हा तुम्ही पार्ट २ अनुभवाल तेव्हा काय होईल!"
'धुरंधर'ची तगडी स्टारकास्ट
आदित्य धर यांच्या लेखणीतून आणि दिग्दर्शनातून साकारलेल्या या चित्रपटात रणवीर सिंग, संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल आणि अक्षय खन्ना यांसारखे दिग्गज कलाकार आहेत. यामध्ये अक्षय खन्नाने साकारलेल्या रहमान डकैत या भूमिकेचे प्रचंड कौतुक होत आहे, विशेषतः त्याचे डान्सिंग स्टाईल सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे. चित्रपटात सारा अर्जुन ही मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत आहे, तर क्रिस्टल डिसूझा आणि आयशा खान यांनी 'शरारत' या गाण्यावर जबरदस्त परफॉर्मन्स दिला आहे. हे गाणे मधुबंती बागची आणि जॅस्मिन सँडलस यांनी गायले आहे.
यशच्या 'टॉक्सिक'शी होणार महाटक्कर
१९ मार्च २०२६ रोजी प्रदर्शित होणाऱ्या 'धुरंधर २' समोर मोठे आव्हान असणार आहे. कारण याच काळात साउथ सुपरस्टार यशचा 'टॉक्सिक' हा बिग बजेट चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. या दोन तगड्या चित्रपटांच्या क्लॅशमध्ये प्रेक्षक कोणाला पसंती देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.