हॉटेल रूममध्ये ही मोठी चूक केली होती विवेक ऑबेरॉयने, याच कारणामुळे ऐश्वर्याने केले होते ब्रेकअप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2020 19:30 IST2020-04-26T19:30:00+5:302020-04-26T19:30:00+5:30

विवेक ऑबेरॉयने केलेल्या या चुकीचा त्याच्या करियरवरही खूप मोठा परिणाम झाला.

This big mistake was made by Vivek Oberoi in the hotel room, this is why Aishwarya had a breakup TJL | हॉटेल रूममध्ये ही मोठी चूक केली होती विवेक ऑबेरॉयने, याच कारणामुळे ऐश्वर्याने केले होते ब्रेकअप

हॉटेल रूममध्ये ही मोठी चूक केली होती विवेक ऑबेरॉयने, याच कारणामुळे ऐश्वर्याने केले होते ब्रेकअप

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिनेता विवेक ऑबेरॉय यांच्या अफेअरची काही वर्षांपूर्वी चांगलीच चर्चा रंगली होती. या नात्याबद्दल कधीच ऐश्वर्याने सांगितले नाही. मात्र विवेक ऑबेरॉयने हॉटेल रूममध्ये केलेल्या एका मोठ्या चुकीमुळे ऐश्वर्या रायने त्याच्याशी बोलणे बंद केले.

ऐश्वर्याचे बॉलिवूडमध्ये पदार्पण होण्यापूर्वी तिचे मॉडेल राजीव मुलचंदानीसोबत अफेअर होते. पण काहीच वर्षांत त्यांच्या दोघांचे ब्रेकअप झाले. त्यानंतर हम दिल दे चुके सनम या चित्रपटाच्या सेटवर सलमान आणि ऐश्वर्या यांची ओळख झाली आणि काहीच दिवसांत त्या दोघांच्या अफेअरची चर्चा मीडियात रंगायला लागली. जवळजवळ दोन वर्षं तरी ते नात्यात होते. 

पण अमरउजाला या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, ऐश्वर्यासोबत नात्यात असताना सलमानने तिला फसवले होते आणि त्याचमुळे ऐश्वर्याने हे नाते संपवण्याचा निर्णय घेतला. पण ऐश्वर्याने आपल्या आयुष्यातून निघून जाणे सलमानला सहन होत नव्हते. त्यामुळे तिच्या चित्रपटांच्या सेटवर तो नेहमीच हंगामा करायचा.

याचदरम्यान तिच्या आयुष्यात विवेक ऑबेरॉयची एंट्री झाली. क्यों हो गया ना या चित्रपटानंतर ते दोघे अनेक सार्वजनिक ठिकाणांवर एकत्र दिसत असत. ऐश्वर्या आणि विवेक नात्यात असल्याची मीडियात चर्चा असली ती ऐश्वर्याने याची कधीच कबुली दिली नाही. पण विवेकने अप्रत्यक्षपणे या गोष्टीविषयी मीडियात सांगितले होते. त्यांच्यात सगळे काही सुरळीत असताना विवेकच्या एका चुकीने त्या दोघांच्या नात्यात दुरावा आला.


विवेकने एका हॉटेलच्या रुममध्ये पत्रकार परिषद बोलावली होती आणि त्यात त्याने थेट सलमानवर आरोप केला. सलमानने त्याला फोनवरून मारण्याची धमकी दिली असे त्याने या पत्रकार परिषदेत सांगितले होते. या सगळ्यामुळे चांगलाच वाद रंगला होता. पण या सगळ्यात माझा काहीही संबंध नसल्याचे ऐश्वर्याने मीडियाला सांगितले होते आणि तेव्हापासून तिने विवेकसोबत बोलणेच बंद केले.
या सगळ्या गोष्टी घडल्या, त्यावेळी सलमान खान हा स्टार होता. ऐश्वर्याने देखील अनेक हिट चित्रपट दिले होते. पण विवेकचे करियर नुकतेच बॉलिवूडमध्ये सुरू झाले होते. या घटनेचा विवेकच्या करियरवर देखील चांगलाच परिणाम झाला.

Web Title: This big mistake was made by Vivek Oberoi in the hotel room, this is why Aishwarya had a breakup TJL