बिग बी बनले सोशल मीडियाचे ‘शहेनशाह’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2016 17:54 IST2016-11-26T17:54:57+5:302016-11-26T17:54:57+5:30

बॉलिवूडचा ‘शहेनशाह’ सुपरस्टार अमिताभ बच्चन हे आता सोशल मीडियाचेही शहेनशाह बनले आहेत. एका संस्थेतर्फे नुकत्याच घेण्यात आलेल्या आॅनलाईन सर्व्हेक्षणानुसार, ...

Big B becomes social media's 'Shaheen Shah'! | बिग बी बनले सोशल मीडियाचे ‘शहेनशाह’!

बिग बी बनले सोशल मीडियाचे ‘शहेनशाह’!

लिवूडचा ‘शहेनशाह’ सुपरस्टार अमिताभ बच्चन हे आता सोशल मीडियाचेही शहेनशाह बनले आहेत. एका संस्थेतर्फे नुकत्याच घेण्यात आलेल्या आॅनलाईन सर्व्हेक्षणानुसार, त्यांनी सर्व खान मंडळींना आणि भावी पिढीला मागे टाकले आहे. एवढेच नव्हे तर, मि. बच्चन यांना सोशल मीडियाचे ‘बेस्ट ब्रँड अ‍ॅम्बेसेडर’ म्हणूनही घोषित करण्यात आले आहेत. फेसबुकवर त्यांची २४७,०१६,८० एवढी फॅन फॉलोर्इंग झाली आहे. फेसबुकअगोदर २०१० मध्ये त्यांनी टिवटर जॉईन केले होते. टिवटरवर त्यांचे २३५,५०८,१८ एवढे फॅन्स आहेत. 

अभिनयात ‘बी टाऊन’च्या सर्व कलाकारांचा ‘बाप’ असणाऱ्या  बिग बींचा हात आता सोशल मीडियावरही कोणीच धरू शकणार नाहीये. ते त्यांच्या दैनंदिन घडामोडींचे फोटोज, पोस्ट, चित्रपटाच्या सेटवरील फोटो, सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असतात. इंटरनेटवरील ते सर्वांत जास्त आकर्षक स्टार आहेत. बिग बींचे मन एवढे मोठे आहे की, ते त्यांच्या सोशल मीडियावरील फॉलोअर्सलाही त्यांचे कुटुंबच मानतात.
 
७४ वर्षीय अमिताभ बच्चन हे त्यांच्या चित्रपटातील अभिनयामुळे सर्वत्र नेहमी चर्चेत असतात. सोशल मीडियावरही ते तेवढेच कदाचित त्यापेक्षा जास्त चर्चेत असतात. अभिनयाने प्रभावित झालेले त्यांचे चाहते आता सोशल मीडियावर त्यांच्यासोबत सतत असतात. 

                                                         

Web Title: Big B becomes social media's 'Shaheen Shah'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.