असं काय घडलं की पापाराझीवर इतकी भडकली भूमी पेडणेकर, व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 13:58 IST2021-03-25T13:57:40+5:302021-03-25T13:58:13+5:30

बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरचे सध्या दोन व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत ती पापाराझीवर भडकलेली दिसते आहे.

Bhumi Pednekar scolded on paparazi video viral on social media | असं काय घडलं की पापाराझीवर इतकी भडकली भूमी पेडणेकर, व्हिडीओ होतोय व्हायरल

असं काय घडलं की पापाराझीवर इतकी भडकली भूमी पेडणेकर, व्हिडीओ होतोय व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरचे सध्या दोन व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत ती पापाराझीवर भडकलेली दिसते आहे. या दोन्ही व्हिडीओ वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत. एक व्हिडीओ त्यावेळचा आहे जेव्हा ती तिच्या कोणत्या तरी फ्रेंडला भेटण्यासाठी गेली होती तेव्हा स्पॉट झाली होती. तर दुसरा व्हिडीओ अंधेरी पश्चिम येथील एका स्टुडिओ बाहेर स्पॉट झाली त्यावेळचा आहे.

पहिल्या व्हिडीओत भूमी पेडणेकरने क्रिम रंगाचा प्रिंटेड हाई स्लिट ड्रेस परिधान केला होता. यासोबत तिने गळ्यात दोन नेकपीस घातले आहेत. तसेच इअररिंग्स घातले होते आणि हँडबॅग होती. यासोबत तिने लाल रंगाचा मास्क घातला होता. या व्हिडीओत पहायला मिळतंय की ती तिच्या कारमधून बाहेर पडली आणि एका स्टुडिओत जाताना दिसली. 


यादरम्यान तिने पापाराझीची विचारपूस केली. त्यानंतर पापाराझी तिला फोटो आणि व्हिडीओसाठी सेंटरमध्ये यायला सांगितले. तेव्हा तिला पापाराझीने तिचा मास्क काढायला सांगितला तेव्हा तिने नकार दिला. त्यानंतर एक दोन पोझ देऊन ती निघून गेली. तेव्हा काही पापाराझीने तिला थांबून पोझ द्यायला सांगितले तेव्हादेखील तिने नकार दिला.


तर दुसऱ्या व्हिडीओत भूमी पेडणेकर आपल्या फ्रेंडला भेटण्यासाठी गेली होती. त्यावेळी पापाराझीने तिला गाठले. या व्हिडीओत पहायला मिळते आहे की, भूमी पेडणेकरने ऑरेंज रंगाचा टॉप आणि काळ्या रंगाची पँट घातली आहे. सोबत तिच्याकडे हॅण्डबॅग आहे. ती गाडीतून उतरून आपल्या फ्रेंडच्या घरी जाताना दिसते आहे. तेव्हा पापाराझींनी तिला पोझ द्यायला सांगितली. तरीदेखील तिथे न थांबता ती पुढे चालू लागली. पापाराझीने तिला थांबायला सांगितले मात्र ती थांबलीच नाही.शेवटी तिने वळून त्यांना उत्तर दिले की ती तिच्या फ्रेंडकडे आली आहे आणि त्यानंतर ती दरवाजा खोलून आत निघून गेली.

Web Title: Bhumi Pednekar scolded on paparazi video viral on social media