भूमी पेडणेकरला पडली ‘जवान’ची भुरळ, मराठमोळ्या गिरीजाचंही केलं कौतुक, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 05:12 PM2023-09-11T17:12:28+5:302023-09-11T17:12:56+5:30

'जवान' पाहून भूमी पेडणेकर भारावली, पोस्ट शेअर करत म्हणाली...

bhumi pednekar praises jawan movie shah rukh khan and film actors girija oak | भूमी पेडणेकरला पडली ‘जवान’ची भुरळ, मराठमोळ्या गिरीजाचंही केलं कौतुक, म्हणाली...

भूमी पेडणेकरला पडली ‘जवान’ची भुरळ, मराठमोळ्या गिरीजाचंही केलं कौतुक, म्हणाली...

googlenewsNext

सध्या सगळीकडे शाहरुख खानच्या ‘जवान’ची हवा आहे. प्रदर्शित होताच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाका केला. किंग खानच्या या चित्रपटाने चाहत्यांना अगदी वेडं करुन सोडलं आहे. जिकडेतिकडे फक्त ‘जवान’चीच चर्चा पाहायला मिळत आहे. दमदार कथा, क्लायमेक्स आणि कसोटीचा अभिनय असलेला जवान प्रेक्षकांच्या पसंतीस उतर आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनाही या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. आता बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरलाही जवानची भुरळ पडली आहे.

‘जवान’ पाहिल्यानंतर भूमीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने शाहरुख खान आणि टीमचं कौतुक केलं आहे. “शाहरुख खान यासाठी लिजेंड बनवले जातात. गौरी खान जवानमधील प्रत्येक क्षण आवडला. अटली कुमार आम्ही त्यांच्यासाठी रडलो आणि टाळ्याही वाजवल्या. नयनतारा खूप छान आणि ताकदीचा अभिनय. विजय सेतुपथी सर तुम्ही या चित्रपटाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. आणि चित्रपटातील गर्ल पावर...सान्या मल्होत्रा, गिरीजा ओक, लेहेर खान, पिलूमनी, इरिधा डोगरा, संगीता भट्टाचार्य...तुमच्या प्रत्येकीच्या स्टोरीने माझ्या काळजात घर केलं,” असं भूमीने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

जिनिलीया गरोदर असल्याच्या चर्चांवर रितेश देशमुखने सोडलं मौन, म्हणाला...

“मराठी चित्रपटसृष्टीत त्याच्यापेक्षा चांगलं...”, प्रवीण तरडेंबद्दल प्रश्न विचारताच गश्मीर महाजनीचं स्पष्ट उत्तर

दरम्यान ‘जवान’ चित्रपटाने पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवरील रेकॉर्ड मोडायला सुरुवात केली आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी देशात ७५ कोटींची तर जगभरात १२७ कोटींची कमाई केली. शाहरुखचा ‘जवान’ बॉक्स ऑफिसवर इतर चित्रपटांना भारी पडत आहे. या चित्रपटाने चार दिवसांत जगभरात ५०० कोटींचा टप्पा पार केला आहे.

Web Title: bhumi pednekar praises jawan movie shah rukh khan and film actors girija oak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.