ऐन दिवाळीमध्ये माधुरीचा झाला होता अपघात; करावं लागलं होतं टक्कल, नेमकं काय घडलं होतं ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2024 17:31 IST2024-10-27T17:30:50+5:302024-10-27T17:31:28+5:30

तुम्हाला माहितेय माधुरीला एकदा टक्कल करावं लागलं होतं.

Bhool Bhulaiyaa 3 Fame Madhuri Dixit Had Horrible Accident In Her Childhood On Diwali | ऐन दिवाळीमध्ये माधुरीचा झाला होता अपघात; करावं लागलं होतं टक्कल, नेमकं काय घडलं होतं ?

ऐन दिवाळीमध्ये माधुरीचा झाला होता अपघात; करावं लागलं होतं टक्कल, नेमकं काय घडलं होतं ?

बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित (madhuri dixit) आजही तिच्या एव्हरग्रीन ब्युटीमुळे चर्चेत येत असते. ९० च्या दशकात माधुरीच्या माधुर्याने भल्याभल्यांना वेड लावलं होतं आणि तिची ही जादू आजतागायत टिकून आहे.  तिला एक्सप्रेशन क्वीन म्हणतात. आता माधुरी 'भूल भुलैया ३' या चित्रपटात दिसणार आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

माधुरीने आजपर्यंत आपल्या अभिनय आणि सौंदर्याने प्रेक्षकांना मोहिनी घातली आहे. पण, तुम्हाला माहितेय माधुरीला एकदा टक्कल करावं लागलं होतं. लहानपणी एकदा दिवाळीमध्ये फटाके पेटवल्याने माधुरीचे केस जळाले होते. त्यामुळे तिला थेट टक्कल करावं लागलं होतं. ते. या घटनेने माधुरी खूप जास्त घाबरली होती. माधुरीने पुन्हा फटाके फोडणं बंद केलं. या घटनेनंतर आता माधुरी फटाके न फोडता दिवाळी साजरी करते.

एका मुलाखतीत माधुरीने सांगितले होते, "लहानपणी एकदा दिवाळीच्या वेळी अपघात झाला होता.  दिवाळीला मैत्रिणींसोबत फटाके फोडत होते. तेव्हा एका मित्राने हातात फटाका ठेवला आणि फटाके पेटवल्याने केस जळाले".  यानंतर माधुरीच्या पालकांना तिचे टक्कल करून घ्यावे लागले होते.  माधुरीच्या 'भूल भुलैया 3' या चित्रपटाबद्दल सांगायचे तर, या चित्रपटात कार्तिक आर्यन, विद्या बालनसारखे कलाकार आहेत. भूल भुलैया 3 मधील माधुरी दीक्षित आणि विद्या बालनचे गाणे व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोघेही डान्स करताना दिसत आहेत. 

Web Title: Bhool Bhulaiyaa 3 Fame Madhuri Dixit Had Horrible Accident In Her Childhood On Diwali