कन्फर्म! ‘भुल भुलैय्या 3’चा येणार, ‘या’ आणखी एका सुपरहिट चित्रपटाच्या सीक्वलचीही तयारी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 01:56 PM2022-05-27T13:56:38+5:302022-05-27T13:59:00+5:30

Bhool Bhulaiyaa 3 : होय, ‘भुल भुलैय्या 3’ ची तयारी सुरु झालीये. खुद्द निर्मात्यांनी याची माहिती दिली आहे.

Bhool Bhulaiyaa 3 And Kabir Singh 2 In The Pipeline producers Bhushan Kumar Confirms | कन्फर्म! ‘भुल भुलैय्या 3’चा येणार, ‘या’ आणखी एका सुपरहिट चित्रपटाच्या सीक्वलचीही तयारी सुरू

कन्फर्म! ‘भुल भुलैय्या 3’चा येणार, ‘या’ आणखी एका सुपरहिट चित्रपटाच्या सीक्वलचीही तयारी सुरू

googlenewsNext

Bhool Bhulaiyaa 3 and Kabir Singh 2 In The Pipeline: बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन व कियारा अडवाणीचा ‘भुल भुलैय्या 2’ ( Bhool Bhulaiyaa 2) या सिनेमावर सध्या प्रेक्षकांच्या उड्या पडत आहेत. सातच दिवसांत 92.5 कोटींची कमाई केली आहे. लवकरच सिनेमा 100 कोटींचा टप्पा पार करेल, असा विश्वास जाणकारांनी व्यक्त केला आहे. आता इतका उत्स्फूर्त प्रतिसाद म्हटल्यावर तिसरा पार्ट तर येणारच. तर तुमच्यासाठी गुडन्यूज आहे. होय, ‘भुल भुलैय्या 3’ ची तयारी सुरु झालीये. खुद्द निर्मात्यांनी याची माहिती दिली आहे.

‘पिंकविला’ ला दिलेल्या मुलाखतीत निर्माता भूषण कुमार व मुराद खेतानी यांनी ‘भुल भुलैय्या 3’ ( Bhool Bhulaiyaa 3)बद्दल अपडेट दिली. ‘भुल भुलैय्या’चा तिसरा पार्ट येणार का? असा प्रश्न भूषण कुमार यांना विचारण्यात आला. यावर ‘भुल भुलैय्या’ची फ्रेन्चाइजीला आम्ही पुढे नेणार. तिस-या पार्टमध्ये दाखवण्यासारखं खूप आहे. लवकरच आम्ही याबद्दलची माहिती देऊ, असं ते म्हणाले.

कबीर सिंग’च्या सीक्वलचीही तयारी
शाहिद कपूरचा ‘कबीर सिंग’ ( Kabir Singh ) हा सिनेमा तुफान गाजला. या चित्रपटाच्या सीक्वलचीही तयारी सुरू झाली आहे. ‘कबीर सिंग’चा दुसरा पार्ट येऊ शकतो. हे एक आयकॉनिक कॅरेक्टर आहे आणि यावर दुसरा पार्टही बनू शकतो, असं भूषण कुमार म्हणाले.

भुल भुलैय्या 2 नं इतके कोटी कमावले
‘भुल भुलैय्या 2’ चित्रपटाने कंगना राणौतच्या ‘धाकड’ला मागे टाकलं आहे. दिग्दर्शक अनीस बज्मी यांनी बनवलेल्या‘भुल भुलैय्या 2’नं सात दिवसांत 92.5 कोटींची कमाई केली आहे.  ट्रेड अ‍ॅनालिस्ट तरण आदर्श यांनी दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटाने गुरुवारी बॉक्स ऑफिसवर 7.27 कोटींची कमाई केली. बॉक्स ऑफिसवरची ही घोडदौड बघता, हा सिनेमा लवकरच 100कोटी क्लबमध्ये एंट्री करेल असं मानलं जात आहे.  ‘भुल भुलैय्या 2’ 100 कोटी क्लबमध्ये सामील होणार या वर्षातील पाचवा चित्रपट ठरणार आहे. शिवाय कार्तिक आर्यनचा आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरणार आहे.

Web Title: Bhool Bhulaiyaa 3 And Kabir Singh 2 In The Pipeline producers Bhushan Kumar Confirms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.