कार्तिक-कियाराच्या 'भूल भुलैया 2'मध्ये झाली टीव्हीवरील या प्रसिद्ध अभिनेत्याची एंट्री

By गीतांजली | Updated: October 5, 2020 18:31 IST2020-10-05T18:07:35+5:302020-10-05T18:31:33+5:30

कार्तिक आर्यन आणि कियारा आडवाणीचा 'भूल भुलैया 2'. या सिनेमाची वाट चाहते मोठ्या आतुरतेने बघतायेत.

Bhool bhulaiyaa 2 film popular tv actor amar upadhyay entry kartik aaryan kiara | कार्तिक-कियाराच्या 'भूल भुलैया 2'मध्ये झाली टीव्हीवरील या प्रसिद्ध अभिनेत्याची एंट्री

कार्तिक-कियाराच्या 'भूल भुलैया 2'मध्ये झाली टीव्हीवरील या प्रसिद्ध अभिनेत्याची एंट्री

लॉकडाऊनच्या आधी बॉलिवूडमध्ये अनेक सिनेमांची घोषणा झाली होती. यातील एक सिनेमा होता कार्तिक आर्यन आणि कियारा आडवाणीचा 'भूल भुलैया 2'. या सिनेमाची वाट चाहते मोठ्या आतुरतेने बघतायेत. मात्र लॉकडाऊनमुळे या सिनेमाचे शूटिंगला ब्रेक लागला होता. आजतकच्या रिपोर्टनुसार डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये या सिनेमाच्या शूटिंगला पुन्हा सुरुवात करण्यात येणार आहे. टीव्हीवरील प्रसिद्ध चेहरा अमर उपाध्यायची सिनेमात एंट्री झाली आहे. 


अमर उपाध्यायची एंट्री
'क्योंंकि सास भी कभी बहू थी' मालिकेतील मिहिर म्हणजेच अमर उपाध्याय आता 'भूल भुलैया 2'चा भाग बनणार आहे. आजतकच्या रिपोर्टनुसार, एका मुलाखती दरम्यान अमर म्हणाला, मी यात राजाचा मुलगा कुंवर सा याची भूमिका साकारत आहे ज्याचे लग्न तब्बूशी झाले आहे. सिनेमाची शूटिंग डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारीमध्ये सुरु होईल. सध्याच्या परिस्थिती संपू्र्ण टीमला घेऊन लखनऊमध्ये जाणं शक्य नाही आहे. सिनेमाचे जवळपास 25 दिवसांचे शूटिंग अजून बाकी आहे. सगळे काही ठिका राहिले तर आम्ही शेड्यूल फॉलो करु  किंवा मग एक महिना पुढे ढकलण्यात येईल.

अभिनेता अक्षय कुमार आणि विद्या बालन यांची प्रमुख भूमिका असलेला 'भूल भुलैय्या' हा चित्रपट २००७ साली रुपेरी पडद्यावर झळकला होता. अक्षय, विद्याचा अभिनय, चित्रपटाची कथा आणि संगीत यामुळे हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. त्यामुळे रुपेरी पडद्यावर  कार्तिक अक्षयसारखी जादू दाखवणार का हे पाहणं रंजक ठरणार आहे
 

कार्तिक आर्यनच्या या चित्रपटात तब्बूची एन्ट्री, जानेवारीत करणार शूटिंगला सुरूवात

 

Web Title: Bhool bhulaiyaa 2 film popular tv actor amar upadhyay entry kartik aaryan kiara