बॉलिवूडचा हॅण्डसम हंक कार्तिक आर्यन लवकरच भूल भुलैया २मध्ये काम करताना दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ते दोघे या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र काम करताना दिसणार आहे. आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री तब्बूदेखील या चित्रपटात दिसणार आहे.


मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार, तब्बूने भूल भूलैयाच्या सीक्वलमध्ये काम करण्यास होकार दिला आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांचं म्हणणं आहे की तिला या चित्रपटातील भूमिका व स्क्रीप्ट खूप आवडली आहे. तब्बू जानेवारी महिन्यात या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात करणार आहे. हे चित्रपटाचे दुसऱ्या शेड्युलचं शूटिंग असणार आहे जे तीन महिने चालणार आहे. या सिनेमाचं शूटिंग लंडन व राजस्थानमध्ये होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, तब्बू चित्रपटाचा युएसपी आहे.


काही दिवसांपूर्वी कार्तिक आर्यनने भूल भुलैया २मधील फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर केला होता. या कार्तिक भूल भुलैयामधील अक्षय कुमारच्या लूकमध्ये दिसला.

केशरी रंगाचा कुर्ता-पायजमा, हातात त्रिशूळ, कपाळावर टिळक, गळ्यात रुद्राक्षांच्या माळांमध्ये कार्तिक दिसला.

या चित्रपटाबद्दल कियारा अडवाणी म्हणाली की भूल भुलैया हा मी पाहिलेला पहिला हॉरर सिनेमा आहे आणि या चित्रपटाच्या सीक्वलमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली.


शेवटची तब्बू दे दे प्यार दे चित्रपटात झळकली होती. या चित्रपटात तिच्यासोबत अजय देवगण व रकुल प्रीत मुख्य भूमिकेत होते. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Tabu will be seen in Bhool Bhulayya Movie with Kartik Aryan, she will started shooting in January

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.