भोजपुरीची प्रसिद्ध अभिनेत्री अंजली श्रीवास्तवने केली आत्महत्या?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2017 17:42 IST2017-06-20T08:45:18+5:302017-06-20T17:42:09+5:30
अंजली श्रीवास्तवने अनेक भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केले आहे. भोजपुरी इंडस्ट्रीतील ती एक प्रसिद्ध अभिनेत्री मानली जाते. तिच्या राहत्या घरी ...

भोजपुरीची प्रसिद्ध अभिनेत्री अंजली श्रीवास्तवने केली आत्महत्या?
अ जली श्रीवास्तवने अनेक भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केले आहे. भोजपुरी इंडस्ट्रीतील ती एक प्रसिद्ध अभिनेत्री मानली जाते. तिच्या राहत्या घरी तिचा मृतदेह पंख्याला लटकलेला नुकताच आढळून आला. तिने आत्महत्या केली की तिची हत्या झाली याबाबत अद्याप तरी काहीही माहिती पोलिसांना मिळालेली नाही.
अंजली करियरसाठी मुंबईत राहात असली तरी ती मुळची अलाहाबादची आहे. तिच्या कुटुंबातील सगळीच मंडळी ही अलाहाबादमध्ये राहातात. ती अंधेरीत एकटीच एका फ्लॅटमध्ये राहात होती. अंधेरीतील तिच्या घरात ती सोमवारी मृतावस्थेत आढळली. अंजली मुंबईत एकटी राहात असली तरी नेहमीच ती तिच्या कुटुंबियांसोबत फोनवर संपर्कात असायची. तिच्या घरातले अलाहाबादवरून रविवारी तिला सतत फोन करत होते. पण ती तिचा मोबाईल उचलत नसल्याने त्यांना चांगलीच चिंता वाटत होती. अंजलीसोबत काहीतरी वाईट गोष्ट घडली असल्याची तिच्या कुंटुंबियांना भीती वाटत असल्याने त्यांनी ही गोष्ट तिच्या घरच्या मालकांना कळवली. त्यानंतर अंधेरीत अंजली ज्यांच्या घरात राहात होती, त्यांनी फोन करून पोलिसांना बोलावले. पोलिसांनी सोमवारी सकाळी अंधेरीतील परिमल सोसायटीमधील तिचे घर ड्युप्लिकेट चावीने उघडले असता त्यांना तिचा मृतदेह घरातील पंख्याला लटकला असल्याचे दिसून आले. प्रथमदर्शी तरी अंजलीने आत्महत्या केली असल्याचे पोलिसांना वाटत आहे. पोलिसांनी तिच्या घराची शोधाशोध केली असता त्यांना घरात कोणतीच सुसाइड नोट आढळून आली नाही. अंजलीचा मृतदेह कूपर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला असून शवविच्छेदाच्या रिपोर्टनंतरच अंजलीने आत्महत्या केली की तिचा खून झाला हे पोलिस सांगू शकतील.
केहू ता दिलमे बा हा अंजलीचा शेवटचा चित्रपट ठरला.