बच्चा बच्चा जानत है बेताल पहाडे पें काला साया है...! शाहरूख घेऊन येतोय Zombies सीरिज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2020 13:57 IST2020-05-10T13:55:48+5:302020-05-10T13:57:21+5:30

तर भयपटांच्या चाहत्यांनो तयार राहा... होय, कारण शाहरूख खान तुमच्याआमच्यासाठी लवकरच एक हॉरर सीरिज घेऊन येतोय.

Betaal Official Trailer netflix releases trailer of shahrukh khan produced horror series betaal-ram | बच्चा बच्चा जानत है बेताल पहाडे पें काला साया है...! शाहरूख घेऊन येतोय Zombies सीरिज

बच्चा बच्चा जानत है बेताल पहाडे पें काला साया है...! शाहरूख घेऊन येतोय Zombies सीरिज

ठळक मुद्देया सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत असलेला अभिनेता विनीत कुमार याला तुम्ही याआधी ‘मुक्काबाज’ व ‘सांड की आंख’ या सिनेमात पाहिले असेल. 

तर भयपटांच्या चाहत्यांनो तयार राहा... होय, कारण नेटफ्लिक्स तुमच्याआमच्यासाठी लवकरच एक हॉरर सीरिज घेऊन येतोय. या वेबसीरिजचे शीर्षक आहे, ‘बेताल.’ या आगामी वेबसीरिजची सध्या प्रचंड चर्चा आहे. याचे एक कारण हेही आहे की, ही शाहरूख खानची वेबसीरिज आहे. होय, शाहरूखच्या रेड चिलीज एंटरटेनमेंटने ही सीरिज प्रोड्यूस केली आहे. 

निखील महाजन व ब्रिटीश लेखक व दिग्दर्शक पॅट्रिक ग्राहम यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. नुकताच या वेबसीरिजचा ट्रेलर रिलीज झाला.
विनीत कुमार सिंग, अहाना कुमरा, जितेन्द्र जोशी, सिद्धार्थ मेनन यात मुख्य भूमिकेत आहेत. येत्या 24 मे रोजी नेटफ्लिक्सवर ही वेबसीरिज स्ट्रिम होईल.

काय आहे कथा

या थ्रीलर-हॉरर वेबसीरिजच्या कथेबद्दल सांगायचे तर बेताल नावाच्या एका पहाडाची ही कथा आहे. बेताल नावाचा हा पहाड शापित असल्याचे लोक मानत असतात. याच शापित पहाडावरची अनेक वर्षे बंद असलेली एक गुफा उघडली जाते आणि झोंबीची एक फौज त्यातून बाहेर पडते. पोलिसांची एक तुकडी झोम्बीच्या या फौजेशी लढायला पोहोचते.
या सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत असलेला अभिनेता विनीत कुमार याला तुम्ही याआधी ‘मुक्काबाज’ व ‘सांड की आंख’ या सिनेमात पाहिले असेल. तर अहाना कुमरा हिला ‘लिपस्टिक अंडर माय बुर्का’मध्ये पाहिले असेल.

Web Title: Betaal Official Trailer netflix releases trailer of shahrukh khan produced horror series betaal-ram