टायगर श्रॉफच्या 'बागी२' च्या शूटिंगला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2017 15:20 IST2017-09-20T09:50:09+5:302017-09-20T15:20:09+5:30

साजिद नाडीअडवाला यांचा आगामी चित्रपट 'बागी २'च्या शूटिंगला पुण्यात सुरुवात झाली. २०१६ मध्ये 'बागी २' चित्रपट प्रदर्शित करण्यात आला ...

Beginning of Tiger Shroff's 'Baghi 2' shoot | टायगर श्रॉफच्या 'बागी२' च्या शूटिंगला सुरुवात

टायगर श्रॉफच्या 'बागी२' च्या शूटिंगला सुरुवात

जिद नाडीअडवाला यांचा आगामी चित्रपट 'बागी २'च्या शूटिंगला पुण्यात सुरुवात झाली. २०१६ मध्ये 'बागी २' चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता आणि आता या  चित्रपटाच्या दुसरा भागाची म्हणजेच  बागी २ च्या शूटिंग ला पुणे येथील एका महाविद्यालयाच्या परिसरात सुरुवात झाली आहे. 

'बागी २'एक एक्शन चित्रपट असून या चित्रपटात मुख्य भूमिकेत टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी दिसतील. एक्शनची एक नवी पर्व घेऊन येण्यासाठी हा चित्रपट अगदी तयार आहे. टायगर आणि दिशा यांच्या जोडीचा हा पहिलाच चित्रपट आहे. अनेकवेळा टागयर आणि दिशाला मुंबईतल्या रेस्टोरेंटमधून एकत्र बाहेर पडताना बघितले आहे. ते एकमेकांना टेड करत असल्याच्या चर्चा अनेक महिन्यांपासून आहे. मात्र त्यांनी आपले नातं कधीही अधिकृत स्वीकराले नाही. त्यामुळे दिशा आणि टागयरची हॉट केमिस्ट्री या चित्रपटात प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. बागीमध्ये टागयरसोबत श्रद्धा कपूर झळकली होती. 

ALSO READ : ​‘बागी2’साठी टायगर श्रॉफ करणार असे काही की, जाणून तुम्हालाही बसेल धक्का!

पहिला चित्रपट 'बागी' रिलीज झाल्यानंतर दोन वर्षांनंतर 'बागी २' रिलीज होणार. 'बागी' २९  एप्रिल 2016 रोजी प्रदर्शित झाला होता तर, 'बागी २' २७  एप्रिल 2018 रोजी रिलीज होणार आहे. 2018मध्ये रिलीज होणारा हा सगळ्यात बिग बजेट चित्रपट आहे. साजिद नाडियादवाला यांचा चित्रपटात बॉलिवूडमध्ये या आधी कधी न पाहिलेले अॅक्शन सीन्स यात बघायला मिळतील.  चित्रपटाचा पहिला लूक मेमध्ये रिलीज झाला होता, ज्याला प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता.  'बागी 2' ची निर्मिती  साजिद नडियादवाला यांचा नाडियादवाला ग्रॅन्डसन एंटरटेनमेंट बॅनर अंतर्गत करण्यात येणार आहे. याचित्रपटाचे दिग्दर्शन अहमद खान करणार आहे. गेली सहा महिने 
 बागी २मध्ये सैनिकाची भूमिका करण्यासाठी टायगरला आपला लूक चेंज करावा लागू शकतो अशाही चर्चा रंगल्या आहेत. या चित्रपटातील अ‍ॅक्शन सिन्ससाठी त्याला विशेष प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. हे प्रशिक्षण त्याला टॉनी देणार आहे. टॉनीने शाओलिन सॉकर या चित्रपटासाठी कोरिओग्रॉफी केली आहे.

Web Title: Beginning of Tiger Shroff's 'Baghi 2' shoot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.