करिअरच्या सुरुवातीलाच जान्हवी कपूरने व्यक्त केली 'ही' इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2018 16:53 IST2018-10-03T16:41:41+5:302018-10-03T16:53:53+5:30

अभिनेत्री जान्हवी कपूरने ब्राइड्स टुडे मॅगझीन ऑक्टोबर 2018साठी फोटोशूट केले आहे. फोटोशूट दरम्यान दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये जान्हवीने अनेक खुलासे केले आहे.

At the beginning of the career, janhavi Kapoor expressed 'only' wish | करिअरच्या सुरुवातीलाच जान्हवी कपूरने व्यक्त केली 'ही' इच्छा

करिअरच्या सुरुवातीलाच जान्हवी कपूरने व्यक्त केली 'ही' इच्छा

ठळक मुद्देलवकरच जान्हवी करण जोहरच्या मल्टी स्टारर 'तख्त'मध्ये दिसणार आहे

अभिनेत्री जान्हवी कपूरने ब्राइड्स टुडे मॅगझीन ऑक्टोबर 2018साठी फोटोशूट केले आहे. फोटोशूट दरम्यान दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये जान्हवीने अनेक खुलासे केले आहे. जान्हवीने सांगितले की काही वर्षांपूर्वी ती फ्लोरेंसला गेली होती तेव्हा तिने म्हटले होते की मला इथंच लग्न करायचे आहे. आजही जान्हवीला त्याच ठिकाणी लग्न करायचे आहे. जान्हवीला लग्नात गोल्डन रंगाची कांजीवरम साडी नेसायची आहे.  जान्हवीने सांगितले सगळं माझ्या मूडवर असते कधी मला अमेरिकन अभिनेता मेट डमन आवडतो आणि मला दिग्दर्शक गुरु दत्तसुद्धा आवडतात.  

लवकरच जान्हवी करण जोहरच्या मल्टी स्टारर 'तख्त'मध्ये दिसणार आहे. रणवीर सिंगच्या अपोझिट जान्हवी कपूरला कास्ट करण्यात आले आहे. पहिल्यांदाच जान्हवी आणि रणवीरची जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आलिया भट्टची विकी कौशलसोबत जोडी जमणार आहे.

‘तख्त’ या पीरियड ड्रामात अर्थात ऐतिहासिक चित्रपटात मुघल शासनकाळातील एक कथा दाखवली जाईल. राजसिंहासनावरचे प्रेम आणि ते मिळवण्यासाठीची वाट्टेल त्या स्तराला जाण्याचे मनसुबे असे याचे कथानक असेल. शहाजहान आणि मुमताज यांच्या दोन मुलांच्या अर्थात दोन भावंडांमधील सिंहासनासाठीच्या वादाची कथा यात दिसेल. करण जोहर निर्मित या चित्रपटात रणवीर सिंग, करीना कपूर, आलिया भट्ट, जान्हवी कपूर, अनिल कपूर, विकी कौशल आणि भूमी पेडणेकर असे तगडे कलाकार आपले अभिनय कौशल्य पणाला लावताना दिसतील. रणवीर व विकी यात दोन भावांची भूमिका साकारतील. जान्हवी रणवीर सिंगच्या प्रेयसीची तर करीना त्याच्या बहिणीच्या भूमिकेत असेल. आलिया भट्ट विकी कौशलच्या पत्नीची भूमिका वठवणार. ‘धडक’नंतर जान्हवीचा हा दुसरा चित्रपट असेल. या मल्टीस्टारर चित्रपटाचे संवाद हुसैन हैदरी लिहिणार आहेत. २०२० मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येईल. 
 

Web Title: At the beginning of the career, janhavi Kapoor expressed 'only' wish