बाबो..! आई होण्याआधी अनुष्का शर्माने विराट कोहलीसमोर ठेवली होती 'ही' अट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2021 11:53 IST2021-06-28T11:52:59+5:302021-06-28T11:53:24+5:30

अनुष्का शर्माने चित्रपटातून ब्रेक घेतला असला तरी ती सोशल मीडियावर सक्रीय आहे.

Before becoming a mother, Anushka Sharma had put this condition before Virat Kohli | बाबो..! आई होण्याआधी अनुष्का शर्माने विराट कोहलीसमोर ठेवली होती 'ही' अट

बाबो..! आई होण्याआधी अनुष्का शर्माने विराट कोहलीसमोर ठेवली होती 'ही' अट

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा नेहमीच चर्चेत असते. अनुष्का शर्माने चित्रपटातून ब्रेक घेतला असला तरी ती सोशल मीडियावर सक्रीय आहे. त्यामुळे ती बऱ्याचदा फोटो शेअर करत असते आणि चर्चेत येत असते. अनुष्का शर्माने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीसोबत लग्न केले. दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. यावर्षी अनुष्का आणि विराटने एका मुलीला जन्म दिला. तिचे नाव वामिका ठेवले आहे. मात्र आई होण्याआधी अनुष्काने विराटसमोर एक अट ठेवली. 

अनुष्का शर्माने सांगितले होते की, त्यांच्या मुलांचा सांभाळ एका सामान्य मुलांप्रमाणे झाला पाहिजे. त्यांच्या कामाचा कोणताही परिणाम मुलांच्या जीवनावर झाला नाही पाहिजे, याकडे त्यांचे जास्त लक्ष असायले हवे. ठरवल्याप्रमाणेच विराट आणि अनुष्का मुलगी वामिकाचा सांभाळ करत आहेत. विराटने देखील त्यांच्या मुलांबद्दल एक महत्त्वाची गोष्ट शेअर केली. 


विराट कोहलीने म्हणाला, 'गेल्या काही वर्षांमध्ये अनुष्कासोबत असल्यामुळे माझ्या आयुष्यात अनेक बदल झाले आहेत. माझे स्वतःचे जीवन आहे.  माझी फॅमिली आहे. माझ्या मुलांसोबत वेळ व्यतीत करण्याचा मला पूर्ण हक्क आहे.

मी माझ्या करियर आणि कामाच्या गोष्टी कधीच घरी शेअर करत नाही. माझे पुरस्कार देखील घरात नसतील कारण जेव्हा मुले मोठी होतील तेव्हा त्यांना असे नको वाटायला की ते एका सेलिब्रिटींच्या घरातील आहेत, असे विराटने सांगितले.

Web Title: Before becoming a mother, Anushka Sharma had put this condition before Virat Kohli