​परिणीती नर्व्हस असण्यामागे हे आहे कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2016 17:43 IST2016-12-18T17:43:31+5:302016-12-18T17:43:31+5:30

अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या प्रचंड नर्व्हस आहे आणि तिच्या नर्व्हस असण्यामागचे कारण आहे, तिची चुलत बहिण प्रियांका चोप्रा. होय, ...

This is because the result is Nervous! | ​परिणीती नर्व्हस असण्यामागे हे आहे कारण!

​परिणीती नर्व्हस असण्यामागे हे आहे कारण!


/>अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या प्रचंड नर्व्हस आहे आणि तिच्या नर्व्हस असण्यामागचे कारण आहे, तिची चुलत बहिण प्रियांका चोप्रा. होय, प्रियांकाच्या काही लोकप्रीय गाण्यांवर परिणीती एका अवार्ड शोमध्ये परफॉर्म करणार आहे. याचेच परिणीतीला जाम टेन्शन आलेय. सध्या ती याच तयारीत गुंतली आहे. पण आपण प्रियांकाच्या १० टक्के तरी देऊ शकू का? या विचाराने ती नर्व्हस आहे.
यापूर्वी मी कधीही इतके नर्व्हस नव्हते. प्रियांकाच्या गाण्यांवर परफॉर्म करणे, हा मी माझा गौरव समजते. मी कधीच प्रियांका बनू शकत नाही, हे मला ठाऊक आहे. तसा माझा प्रयत्नही नाही. पण प्रियांकाची बहिण या नात्याने तिच्या गाण्यांना स्टेजवर न्याय देण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. मी तिच्या १० टक्के जरी स्टेजवर देऊ शकले तरी पुरे आहे, असे परिणीती म्हणाली. 

{{{{twitter_post_id####}}}}


{{{{twitter_post_id####}}}}


यापूर्वी अमेरिकेतील ‘ड्रिम टीम टूर’दरम्यानही परिणीतीने प्रियांकाच्या गाण्यावर परफॉर्म केला होता. प्रियांकाच्या ‘दोस्ताना’मधील ‘देसी गर्ल’वर परिणीती थिरकताना दिसली होेती. आता पुन्हा एकदा आपल्या मिमी दीदीच्या गाण्यांवर परफॉर्म करण्यास परी सज्ज झाली आहे. यासाठी परी जीव तोडून मेहनत करतेय. याचा एक व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ‘ढउ ्न४ल्ल्रङ्म१ स्रं८२ ३१्रु४३ी ३ङ्म ढउ २ील्ल्रङ्म१’ असे कॅप्शन तिने यास दिले आहे. आता ज्युनिअर पीसीची ही मेहनत किती फळास येते, ते बघूयात. शिवाय यासाठी तिला शुभेच्छाही देऊ यात. 

Web Title: This is because the result is Nervous!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.