बेबो पडली स्क्रिप्टच्या प्रेमात !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2016 11:53 IST2016-06-17T06:23:18+5:302016-06-17T11:53:18+5:30

करिना कपूर खान ही तिचे चित्रपट आणि भूमिका खूप विचारपूर्वक निवडत असते. ‘उडता पंजाब’ नंतर करिना आता कोणता चित्रपट ...

Bebo fell in love with script! | बेबो पडली स्क्रिप्टच्या प्रेमात !

बेबो पडली स्क्रिप्टच्या प्रेमात !

िना कपूर खान ही तिचे चित्रपट आणि भूमिका खूप विचारपूर्वक निवडत असते. ‘उडता पंजाब’ नंतर करिना आता कोणता चित्रपट साकारणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. तिने नुकतेच जाहीर केले आहे की, एकता कपूर आणि रिहा कपूर यांच्या ‘वीरे दी वेडिंग’ चित्रपट ती करणार आहे.

यात सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तल्सानिआ यांच्यासोबत बेबो दिसणार आहे. बेबो म्हणते,‘ मला माहीत नाही पण, मी चित्रपटाच्या स्क्रिप्टच्या प्रेमात पडले आहे. रिहाने मला चार महिन्यांपूर्वी स्क्रिप्ट दिली होती. यात चार गाणे असून २ हिरो आणि २ हिरोईन आहेत.

चार शाळेच्या मित्रांची ही कथा असून त्यांच्या एका मित्राच्या लग्नाच्यावेळी त्यांचे आयुष्य कसे बदलून जाते? यांवर संपूर्ण चित्रपट आधारलेला आहे. चित्रपटाची शूटींग १ आॅगस्टला होणार आहे.’

Web Title: Bebo fell in love with script!