मल्लिका शेरावतचे लॉस एंजलिसमधले घर तुम्ही पाहिलंय का? जगते आलिशान आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2021 12:31 PM2021-10-02T12:31:43+5:302021-10-02T12:37:40+5:30

. 'मर्डर' सिनेमासाठी मल्लिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.मल्लिका आता फक्त तिच्या खासगी कारणामुळे चर्चेत असते. मल्लिका सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असून चाहत्यांसोबत फोटो व्हिडीओ शेअर करत संपर्कात असते.

Beauty! Check Mallika Sherawats this Villa in Los Angeles, it's stunning | मल्लिका शेरावतचे लॉस एंजलिसमधले घर तुम्ही पाहिलंय का? जगते आलिशान आयुष्य

मल्लिका शेरावतचे लॉस एंजलिसमधले घर तुम्ही पाहिलंय का? जगते आलिशान आयुष्य

googlenewsNext

आपल्या लाडक्या कलाकारांबद्दल जाणून घेण्याची प्रत्येक फॅनची इच्छा असते. चित्रपटांसह त्यांचं खासगी जीवन, त्यांच्या जीवनात घडणाऱ्या घडामोडी, राहणीमान इत्यादी गोष्टींची फॅन्सना उत्सुकता असते. कलाकारांचे बंगले, फार्महाऊस याबाबत फॅन्सच्या मनात कुतूहल असतं. एका कलाकाराच्या घराबाबत आपण जाणून घेणार आहोत. 

जलेबीबाई म्हणत साऱ्यांना थिरकण्यास भाग पाडणारी मल्लिका शेरावत...आयटम गर्ल अशी ओळख झालेली आणि मादक अदांमुळे कायम चर्चेत असणारी मल्लिका शेरावत. काळानुसार मल्लिकाची क्रेझ कमी होत गेली आणि ती कधी बॉलिवूडपासून दूर झाली हे तिचेच तिला कळाले नाही. 'मर्डर', 'प्यार के साईड इफ्केट' आणि 'डबल धमाल' हे मल्लिकाचे बॉलिवूडमधील चित्रपट आहेत.

'मर्डर' सिनेमासाठी मल्लिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.मल्लिका आता फक्त तिच्या खासगी कारणामुळे चर्चेत असते. मल्लिका सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असून चाहत्यांसोबत फोटो व्हिडीओ शेअर करत संपर्कात असते. मल्लिका मुंबईत राहत नसून ती लॉस एंजलिसमध्ये राहते. 

परदेशात ती आलिशान आयुष्य जगते. नुकतेच तिचे लॉस एंजलिसमधल्या आलिशान बंगल्याचे काही व्हिडीओ तिने शेअर केले होते. शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सगळंच आलिशान असल्याचे पाहायला मिळेल. मल्लिकाच्या बंगल्याचे व्हिडीओ समोर आल्यापासून याबाबत अधिक जाणून घेण्यासाठी फॅन्सच्या मनात कुतूहल निर्माण झाले आहे. मल्लिकाचा लॉस एंजिलसमधला हा बंगला इतका आलिशान आणि भव्य आहे की पाहणाऱ्यांचे डोळे दिपून जातील. गार्डन एरिया पासून ते पूल एरियापर्यंत सगळ्याच गोष्टी खूपच आकर्षक आहेत. त्याला घर म्हणणं खरं तर अन्यायच होईल इतका तो आलिशान आहे.

व्हिडीओमध्ये कधी पूल शेजारी बसून निवांत वेळ घालवताना ती दिसत आहे. तर कधी तिच्या डॉगीसोबत खेळताना दिसत आहे. व्हिडीओच्या सुरुवातीलाच ती ब्लू फ्रेंच दरवाज्यातून बाहेर येताना दिसते.तिच्या या बंगल्याप्रमाणेच तिचे आयुष्यही किती आलिशान आहे याचीच प्रचिती या व्हिडीओरुन येते.

 

आज बॉलिवूडपासून ती दूर असली तरी कोट्यवधीची मालकीन आहे. भारतीय चलनानुसार मल्लिका आज 113 कोटी संपत्तीची मालकीण आहे. 

Web Title: Beauty! Check Mallika Sherawats this Villa in Los Angeles, it's stunning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.