B'day Special : ‘या’ अभिनेत्रीच्या बोल्डनेसची गुगलनेही घेतली धास्ती; काही तासांतच केले असे काही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2018 16:37 IST2018-03-11T11:07:46+5:302018-03-11T16:37:58+5:30

आपल्या बोल्ड अदांनी चाहत्यांना घायाळ करणाºया या अभिनेत्रीची चक्क गुगलने धास्ती घेतली होती. गुगलने काही तासांतच या अभिनेत्रीचे अ‍ॅप हटविले होते.

B'day Special: 'The actress' boldness of Google too was taken; Something done in a few hours! | B'day Special : ‘या’ अभिनेत्रीच्या बोल्डनेसची गुगलनेही घेतली धास्ती; काही तासांतच केले असे काही!

B'day Special : ‘या’ अभिनेत्रीच्या बोल्डनेसची गुगलनेही घेतली धास्ती; काही तासांतच केले असे काही!

ल्या बोल्ड फोटोंमुळे नेहमीच चर्चेत राहणारी मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडे आज ३३ वर्षांची झाली आहे. सेन्सेशन बनलेली पूनम पांडे आज ११ मार्च रोजी तिचा बर्थ डे सेलिब्रेट करीत आहे. पूनम पांडे नेहमीच इन्स्टाग्राम आणि ट्विटर अकाउंटवर तिचे हॉट फोटो शेअर करीत असते. सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव असल्याने तिच्या फॉलोअर्सची संख्या अजूनही वाढतच आहे. आपल्या वाढदिवसानिमित्त पूनमने चाहत्यांना सरप्राइज देण्यासाठी इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर दोन व्हिडीओ शेअर केले आहेत. पहिल्या व्हिडीओमध्ये पूनम आपल्या सेक्सी अदांनी आणि घायाळ करणाºया स्माइलने चाहत्यांची मने जिंकताना दिसत आहे. तर दुसºया व्हिडीओमध्ये पूनम पांडे इमोजी फिल्टरचा आधार घेताना आपला हॉट अवतार दाखविताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये पूनम एक गीत गातांना आपल्या वाढदिवसानिमित्त माहिती देताना दिसत आहे. 

दरम्यान, पूनम पांडे हे नाव तेव्हा चर्चेत आले होते जेव्हा तिने टीम इंडियासाठी अशी काही घोषणा केली होती ज्यामुळे प्रत्येकाच्या तोंडी तिचे नाव होते. २०११ ची ही घटना आहे. जेव्हा भारतीय क्रिकेट टीम वर्ल्डकप खेळत होती. त्यावेळी तिने संघ जिंकल्यास न्यूड होण्याचे प्रॉमिस केले होते. एवढेच काय तर तिने प्रॉमिस पूर्ण करण्यासाठी बीसीसीआयला एक चिठ्ठीही लिहिली होती. परंतु बीसीसीआयने तिला यासाठी परवानगी दिली नव्हती. ज्यामुळे पूनमने असे काही केले नाही. मात्र जेव्हा २०१६ मध्ये टीम इंडियाने टी-२० वर्ल्ड कप टूर्नामेंटमध्ये बांगलादेशाविरोधात विजय मिळविला तेव्हा पूनमने आपल्या ट्विटर अकाउंटवर सेमी न्यूड फोटो शेअर केला होता. 
 

सोशल मीडियावर आपल्या फोटोंनी खळबळ उडवून देणाºया पूनम पांडेने मॉडलिंग व्यतिरिक्त बॉलिवूडपटांमध्येही काम केले. तिने २०१३ मध्ये आलेल्या ‘नशा’ या चित्रपटात एका शिक्षिकेची भूमिका साकारली होती. अमित सक्सेना दिग्दर्शित या चित्रपटात पूनम पांडेने जबरदस्त बोल्ड सीन दिले होते. परंतु अशातही तिचा हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर फारसा करिष्मा दाखवू शकला नव्हता. 
 

पूनमने चित्रपटांमध्ये आयटम नंबरही केले आहेत. परंतु अशातही तिला म्हणावे तसे यश मिळाले नाही. याव्यतिरिक्त पूनम पांडेने ‘खतरों के खिलाडी’ या रिअ‍ॅलिटी शोमध्येदेखील भाग घेतला होता. २०१७ मध्ये तिने तिचा एक अ‍ॅप लॉन्च केला होता. परंतु गुगलने काही तासांतच तो रिजेक्ट करीत, गुगल प्ले स्टोरमधून तो काढून टाकला. या अ‍ॅपचे नाव पांडेय अ‍ॅप असे होते. गुगलने भलेही पूनम पांडेचा अ‍ॅप हटविला असला तरी, सोशल मीडियावर ती तिचे बोल्ड फोटो शेअर करून चाहत्यांची मने जिंकत आहे. 

Web Title: B'day Special: 'The actress' boldness of Google too was taken; Something done in a few hours!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.