बॉलिवूड कलाकरांचा धमाकेदार परफॉर्मन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2016 16:56 IST2016-11-21T16:55:13+5:302016-11-21T16:56:29+5:30

मुंबईच्या एमएमआरडीए ग्राऊंडवर तरुणाईचा सागर उसळला होता. लोकमत मीडिया पार्टनर असलेल्या ग्लोबल सिटीझन फेस्टिव्हलमध्ये सा-यांच्या आकर्षणाचा केंद्र होता तो ...

Battery Performance of Bollywood Artworks | बॉलिवूड कलाकरांचा धमाकेदार परफॉर्मन्स

बॉलिवूड कलाकरांचा धमाकेदार परफॉर्मन्स

ंबईच्या एमएमआरडीए ग्राऊंडवर तरुणाईचा सागर उसळला होता. लोकमत मीडिया पार्टनर असलेल्या ग्लोबल सिटीझन फेस्टिव्हलमध्ये सा-यांच्या आकर्षणाचा केंद्र होता तो म्हणजे रॉक बँडचा निर्माता ख्रिस मार्टिन. यावेळी मैदानातील हजारोच्या संख्येने उपस्थित तरुणाईला प्रतिक्षा होती ती ख्रिसची. कोल्ड प्लेच्या या चाहत्यांमध्ये बॉलीवुडचे चमचमते तारेसुद्धा उपस्थित होते. या तारेतारकांनीही उपस्थितांचं खास परफॉर्मन्स देत मनोरंजन करण्याची संधी सोडली नाही. या रॉकिंग इव्हेंटमध्ये बहुतांशी गाणी इंग्रजीत सादर झाली. प्रत्येक गाण्याला रसिकांचा तितकाच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मात्र एका परफॉर्मन्सवेळी मात्र एमएमआरडी मैदानात हर हर महादेवचा नाद गुंजला. अभिनेता रणवीर सिंहने बाजीराव मस्तानी सिनेमातील ''मल्हारी'' गाण्यावर ठेका धरताच सारी तरुणाई हर हर महादेवचा जल्लोष करु लागली.

 AR Rahman Performance at Global Citizen Festival
असाच काहीसा जल्लोष झाला तो ए.आर. रेहमान यांनी सादर केलेल्या ''हम्मा हम्मा'' या गाण्याच्या वेळी. आजही या रेहमान आणि या गाण्याची जादू कमी झाली नसल्याचे यावेळी पाहायला मिळाले. गायक अरिजीत सिंहने 'ऐ दिल है मुश्किल' सिनेमातील गाण्याने वातावरण रोमँटिक केले. तर शंकर एहसान लॉयने ''झूम बराबर झूम'' या गाण्यावर उपस्थितांना थिरकायला भाग पाडलं. अभिनेता फरहान अख्तरने 'रॉक ऑन-2' सिनेमातील गाणे सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. तो एवढ्यावरच थांबला नाही. त्याने बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासह ''अतरंगी यार'' हे गाणं सादर केले. बिग बींनी आपल्या दमदार आवाजात सादर केलेल्या कवितेलाही उपस्थितांची दाद मिळाली. 

 Farhan Akhtar performed with Big B at Global Citizen Festival

Web Title: Battery Performance of Bollywood Artworks