मालदीव्ह व्हॅकेशन्सवरून परतलीय ‘बार्बी डॉल’ कॅटरिना कैफ; पाहा फोटोज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 18:32 IST2019-04-07T18:30:28+5:302019-04-07T18:32:57+5:30
कॅटरिना ही आठवड्याभराच्या मालदीव्ह्ज व्हॅकेशन्सवरून परतली आहे. तिच्यासोबत तिची ट्रेनर आणि बेस्ट फ्रेंड यास्मिन कराचीवाला ही देखील दिसत आहे. नुकतेच या दोघींचे एअरपोर्टवरचे फोटोज आणि व्हिडीओज व्हायरल झाले आहेत.

मालदीव्ह व्हॅकेशन्सवरून परतलीय ‘बार्बी डॉल’ कॅटरिना कैफ; पाहा फोटोज
बॉलिवूडची बार्बी डॉल म्हणून आपण कॅटरिना कैफ हिला ओळखतो. आपली हीच डॉल सध्या सलमान खानसोबत ‘भारत’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाबाबतीत चर्चेत आहे. मात्र तुम्हाला माहितीये का? अशातच कॅटरिना ही आठवड्याभराच्या मालदीव्ह्ज व्हॅकेशन्सवरून परतली आहे. तिच्यासोबत तिची ट्रेनर आणि बेस्ट फ्रेंड यास्मिन कराचीवाला ही देखील दिसत आहे. नुकतेच या दोघींचे एअरपोर्टवरचे फोटोज आणि व्हिडीओज व्हायरल झाले आहेत. तुम्हाला पाहायचेत का त्यांचे हे फोटोज..
या फोटोंमध्ये ती निळया रंगाच्या डेनिम्स, पांढऱ्या रंगाचा टी आणि निळया रंगाचा जॅकेट या ड्रेसिंगमध्ये ती होती. तिचा हा ग्लॅमरस अंदाज नक्कीच एअरपोर्टवर सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. तिने यास्मिन कराचीवाला आणि डॅनिअल ब्युअर यांच्यासोबत मालदीव्ह्ज येथे जवळपास १ आठवडाभर व्हॅकेशन एन्जॉय केले. त्यांचे फोटोज आणि व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यापूर्वीही कॅटरिनाचा लाल आणि निळया रंगाच्या मोनोकिनी ड्रेसमध्ये फोटोज आपले पाहिले आहेत. कॅटरिना आणि यास्मिन या दोघीही खूप चांगल्या मैत्रिणी असून कित्येक वर्षांपासून यास्मिन ही तिची ट्रेनर देखील आहे. या दोघींचा बीचवरचा एक व्हिडीओ २० मिलियन चाहत्यांनी लाईक केला आहे.