‘बजरंगी भाईजान’ फेम मेहेर वीजने या प्रसिद्ध अभिनेत्यासह केले आहे लग्न, पाहा त्यांचा लग्नाचा अल्बम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2020 14:06 IST2020-09-02T14:02:02+5:302020-09-02T14:06:08+5:30

दिल्लीत जन्म झालेल्या मेहरने आजवर सिनेमात ब-याच छोट्या छोट्या भूमिका साकारल्या आहेत. 'नो टाईम फॉर लव', 'दिल विल प्यार व्यार' अशा सिनेमात तिने सहकलाकार म्हणून भूमिका साकारल्या आहेत.

'Bajrangi Bhaijaan' Fame Meher Vij Is Married To A Famous Bollywood Actor And They Look Adorable | ‘बजरंगी भाईजान’ फेम मेहेर वीजने या प्रसिद्ध अभिनेत्यासह केले आहे लग्न, पाहा त्यांचा लग्नाचा अल्बम

‘बजरंगी भाईजान’ फेम मेहेर वीजने या प्रसिद्ध अभिनेत्यासह केले आहे लग्न, पाहा त्यांचा लग्नाचा अल्बम

‘बजरंगी भाईजान' हा सिनेमा भाईजान आणि मुन्नीवर आधारित होता. असं असलं तरी इतर कलाकारही तितकेच महत्त्वाचे होते. त्यांची भूमिका छोटीशी असली तरी ती विशेष होती. या सिनेमात मुन्नीसह तिची अम्मीही होती. मुन्नीच्या या अम्मीची सा-यांनीच रुपेरी पडद्यावर झलक पाहिली आहे. प्रत्यक्षात मात्र ही अम्मी रिल दुनियेपेक्षा कितीतरी वेगळी आहे.

मुन्नीच्या अम्मीची भूमिका साकारणा-या या अभिनेत्रीचं नाव मेहर विज असं आहे. मेहेर आता एका खास कारणामुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर मेहेरच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले आहेत. मानव वीजसह मेहेरन लग्न झाले आहे. मानव देखील कलाकार असून तो पंजाबी इंडस्ट्रीत लोकप्रिय चेहरा आहे. दोन वर्षापूर्वी मेहेर लग्नबंधनात अडकली होती. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता मेहेरचे लग्न पार पडले होते. 
 

दिल्लीत जन्म झालेल्या मेहरने आजवर सिनेमात ब-याच छोट्या छोट्या भूमिका साकारल्या आहेत. 'नो टाईम फॉर लव', 'दिल विल प्यार व्यार' अशा सिनेमात तिने सहकलाकार म्हणून भूमिका साकारल्या आहेत. छोट्या पडद्यावरही मेहरने भूमिका साकारल्या आहेत. 'राम मिलायें जोडी', 'किस देश में है मेरा दिल' अशा मालिकांमध्येही तिच्या अभिनयाची जादू पाहायला मिळाली. 

रिअल लाईफमध्येही तिच्या सौंदर्यावर रसिक फिदा होतात. त्यामुळेच की काय अभिनेता मानव विजसुद्धा मेहरकडून क्लीन बोल्ड झाला. आनंद देणे, प्रत्येक क्षणाचा आनंद घेणे ही मेहरची खासियत आहे. याशिवाय मजामस्करी करणंही तिला तितकंच भावतं. तिचा हाच स्वभाव तिच्या फोटोंमध्येही पाहायला मिळतो. 

Web Title: 'Bajrangi Bhaijaan' Fame Meher Vij Is Married To A Famous Bollywood Actor And They Look Adorable