सलमान खान पुन्हा बनणार बजरंगी भाईजान, सिनेमाचा सिक्वेल येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2021 14:10 IST2021-07-19T14:06:09+5:302021-07-19T14:10:17+5:30

2015 मध्ये 'बजरंगी भाईजान' प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर 320 कोटींपेक्षा जास्त कमाई सिनेमाने केली होती. आजही सिनेमा आवडीने टीव्हीवर पाहिला जातो.

Bajrangi Bhaijaan 2 Is Finally Happening, Salman Khan Has Liked The ‘Idea’ Shared By ‘Baahubali’ Writer KV Vijayendra Prasad | सलमान खान पुन्हा बनणार बजरंगी भाईजान, सिनेमाचा सिक्वेल येणार

सलमान खान पुन्हा बनणार बजरंगी भाईजान, सिनेमाचा सिक्वेल येणार

कबीर खान दिग्दर्शिक बजरंगी भाईजान सिनेमाला ६ वर्ष पूर्ण झाले आहेत.बॉलीवुडचा दबंग खान सलमानचा बजरंगी भाईजान हा सिनेमा सगळ्यांनीच पाहिला असेल. या सिनेमातील भाईजान सा-यांनाच भावला असेल. हा सिनेमा भाईजान आणि मुन्नीवर आधारित होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरही प्रचंड कमाई करत सुपरहिट ठरला होता. 2015 मध्ये 'बजरंगी भाईजान' प्रदर्शित झाला होता.  

 

बॉक्स ऑफिसवर 320 कोटींपेक्षा जास्त कमाई सिनेमाने केली होती. आजही सिनेमा आवडीने टीव्हीवर पाहिला जातो. आता याच सिनेमाचा सिक्वेलही रसिकांच्या भेटीला येणार आहे. दिलेल्या एका मुलाखतीत सिनेमाचे लेखक के.व्ही विजयेंद्र यांनी सिनेमाचा सिक्वेल येऊ शकतो असे संकेत दिले आहेत. विजयेंद्र यांनी बाहुबली सिनेमाचीही कथा लिहीली होती.

सिनेमाच्या स्टोरीवरही कामा चालु असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे सलमानच्या चाहत्यांसाठी सिनेमाचा सिक्वेल पाहणे नक्कीच आनंदाची बाब ठरणार हे मात्र नक्की. सलमानसोबतचही त्यांचे यावर बोलणं झाले आहे. विजयेंद्र यांनी सलमानला सिनेमाची कथाही ऐकली. सिनेमाच्या सिक्वेलसाठी सलमानही उत्सुक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. 

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर  सलमान खान सध्या कतरिना कैफसोबत 'टायगर 3' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. हा सिनेमा बँड बाजा बारात, लेडीज व्हर्सेस रिकी बहल, शुद्ध देसी रोमान्स आणि फॅन या सिनेमाचे दिग्दर्शक मनीष शर्मा दिग्दर्शित करत आहेत. या सिनेमात मुख्य खलनायक म्हणून इमरान हाश्मी झळकणार आहे. सिनेमाचे शूटिंगसाठी वेगवेगळ्या लोकेशनची निवड करण्यात आली असून सिनेमात नयनरम्य स्थळही रसिकांना पाहाता येणार आहे. 

Web Title: Bajrangi Bhaijaan 2 Is Finally Happening, Salman Khan Has Liked The ‘Idea’ Shared By ‘Baahubali’ Writer KV Vijayendra Prasad