गुडघ्याची शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर मुंबईत दाखल झाला अभिनेता प्रभास, Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2023 14:09 IST2023-11-08T14:08:14+5:302023-11-08T14:09:25+5:30

प्रभास सध्या 'सालार' आणि 'प्रोजेक्ट के' सिनेमांमुळे प्रभास चर्चेत आहे.

Bahubali actor Prabhas arrived in Mumbai after successfull knee surgery in europe | गुडघ्याची शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर मुंबईत दाखल झाला अभिनेता प्रभास, Video व्हायरल

गुडघ्याची शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर मुंबईत दाखल झाला अभिनेता प्रभास, Video व्हायरल

दाक्षिणात्य अभिनेता प्रभास (Prabhas) 'बाहुबली' च्या यशानंतर स्टार झाला. मात्र काही महिन्यांपूर्वी आलेल्या 'आदिपुरुष' (Adipurush) सिनेमातून त्याने चाहत्यांना निराश केले. 'आदिपुरुष' च्या वादानंतर प्रभास गायबच झाला होता.  युरोपमध्ये त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली असून आता नुकताच चो भारतात परत आला आहे. प्रभासला एअरपोर्टवर पापाराझींनी कॅमेऱ्यात कैद केले. 

प्रभास सध्या 'सालार' आणि 'प्रोजेक्ट के' सिनेमांमुळे प्रभास चर्चेत आहे. नुकताच तो युरोपवरुन परत आला. तिथे त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया पार पडली. विमानतळावर प्रभास स्पॉट झाला असून पापाराझींनी त्याला कॅमेऱ्यात कैद केले. त्याने काळ्या रंगाचे कपडे, गॉगल, डोक्यावर टोपी आणि मास्क लावला आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

'आदिपुरुष' च्या अपयशानंतर आता प्रभासला 'सालार' कडून अपेक्षा आहेत. चाहत्यांनाही प्रभासच्या या सिनेमाची उत्सुकता आहे. सालार दोन भागांमध्ये रिलीज होणार आहे. पहिला भाग 'सालार : सीजफायर' असा असणार आहे. 

'सालार' मध्ये प्रभाससोबतच श्रुती हसन,  पृथ्वीराज सुकुमारन आणि जगपति बाबू यांचीही भूमिका आहे. हा सिनेमा हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये रिलीज होणार आहे. 

Web Title: Bahubali actor Prabhas arrived in Mumbai after successfull knee surgery in europe