"डोळ्याला सूज, बांधली पट्टी...", शिकागो येथील कॉन्सर्टवेळी रॅपर बादशाहला गंभीर दुखापत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 12:23 IST2025-09-24T12:22:55+5:302025-09-24T12:23:43+5:30
बादशाहने कॅप्शनमध्ये लिहिले...

"डोळ्याला सूज, बांधली पट्टी...", शिकागो येथील कॉन्सर्टवेळी रॅपर बादशाहला गंभीर दुखापत
रॅपर आणि गायक बादशाहची पोस्ट व्हायरल होत आहे. त्याच्या दोन्ही डोळ्यांना दुखापत झाल्याचं दिसत आहे. एका डोळ्याला तर पट्टी बांधली आहे. बादशाहने स्वत:च जखमी अवस्थेतील फोटो पोस्ट केला आहे. नुकतीच त्याची शिकागो येथे लाईव्ह कॉन्सर्ट झाली. बादशाहची अशी परिस्थिती कशी काय झाली? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. अनेकांनी कमेंट करत त्याच्या तब्येतीसाठी प्रार्थना केली आहे.
बादशाहने इन्स्टाग्रामवर हे दोन फोटो शेअर केले आहेत. त्याचा एक डोळा चांगलाच सुजलेला दिसत आहे. तर आणखी एका फोटोत डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे. त्याच्या चेहऱ्याला चांगलीच दुखापत झाली आहे. या अवस्थेतही बादशाह मजेशीर कॅप्शन लिहिले. आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' सीरिजचा संदर्भ देत तो लिहितो, 'अवतार जी का मुक्का हिट करता है जैसे..'
बॅड्स ऑफ बॉलिवूड सीरिजमध्ये बादशाहनेही कॅमिओ केला आहे. यामध्ये तो आणि अभिनेते मनोज पाहवा भिडताना दिसतात. बादशाहची हा फोटो वेबसीरीजच्या शूटचा आहे का असाही काही जणांनी अंदाज लावला. मात्र एका चाहतीने या पोस्टवर कमेंट करत लिहिले, 'हे काय झालं. आत्ताच तर तू शिकागोमध्ये परफॉर्म केलं होतंस ना?' यावर बादशाहने उत्तर देत लिहिले, 'त्याच कॉन्सर्टवेळी झालं..पण तरी आम्ही शो पूर्ण केला.'
बादशाह सध्या अमेरिका दौऱ्यावर आहे. काही शहरात त्याचे लाईव्ह शोज झाले. प्रत्येक शोला तुफान प्रतिसाद मिळाला. आता पुढच्या कॉन्सर्टआधी तो लवकर बरा होवो अशी चाहत्यांनी प्रार्थना केली आहे.