आलिया-सिद्धार्थमुळे ‘बद्रिनाथ’चा खोळंबा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2016 09:34 IST2016-10-27T14:52:41+5:302016-10-28T09:34:37+5:30

सिद्धार्थसोबतचे रिलेशन मानायला आलिया भट्ट तयार नाहीयं. लोक समजतात तसे आमच्यात काहीही नाहीयं, असचं ती सांगायचा प्रयत्न करतेय. पण ...

Badrinath's detention due to Ali-Siddharth? | आलिया-सिद्धार्थमुळे ‘बद्रिनाथ’चा खोळंबा?

आलिया-सिद्धार्थमुळे ‘बद्रिनाथ’चा खोळंबा?

द्धार्थसोबतचे रिलेशन मानायला आलिया भट्ट तयार नाहीयं. लोक समजतात तसे आमच्यात काहीही नाहीयं, असचं ती सांगायचा प्रयत्न करतेय. पण लोकांना मात्र काही वेगळेचं दिसतेय. मुंबईच्या एका स्टुडिओतील लोक जे काही बघताहेत, त्यावरून तरी आलिया सिद्धार्थच्या प्रेमात आकंठ बुडाल्याचेच दिसते.

अलीकडे दोघांमधील जवळीक अधिकच वाढल्याचे दिसतेयं आणि यामुळे ‘बद्रिनाथ की दुल्हनिया’ची टीम जाम वैतागली आहे. होय, मुंबईच्या महबूब स्टुडिओत सध्या आलिया व वरूण धवन यांच्या ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’चे शूटींग सुरु आहे. मात्र आल्या दिवशी येथे सिद्धार्थ दिसतोच दिसतो.

कारण बाजुलाच सिद्धार्थ सुद्धा ‘रिलोडेड’ या चित्रपटाचे शूटींग करतो आहे. सेटवरील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या सिद्धार्थ व आलिया यांना परस्परांपासून करमेनासे झाले आहे. बे्रक झाला रे झाला की, दोघेही व्हॅनिटी व्हॅनमध्ये गप्पा मारायला पळतात.

कधीकधी वरूण या दोघांना कंपनी देतो. मात्र वरूण नसतो तेव्हा हे दोघे ‘क्वालिटी टाईम’ एकत्र घालवतात. आलिया तासन् तास सिद्धार्थसोबत व्हॅनिटी व्हॅनमध्ये असते आणि ‘बद्रिनाथ’चे क्रू मेंबर्स मॅडमची प्रतीक्षा करून करून थकतात. अर्थात याऊपरही सिद्धार्थ माझा केवळ चांगला मित्र आहे, असे आलिया सांगते.

अलीकडे एका मुलाखतीत सिद्धार्थ व माझे बे्रकअप व्हायला, आम्ही डेटींगवर होतोच कुठे? असा सवाल आलियाने केला होता. हसिद्धार्थ व आलिया लवकरच ‘आशिकी3’मध्ये एकत्र काम करणार आहेत. निश्चितपणे या दोघांची आॅन स्क्रीन केमिस्ट्री पाहायला प्रेक्षक आतूर आहेत.

Web Title: Badrinath's detention due to Ali-Siddharth?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.