'बडे मियाँ छोटे मियाँ'चं शूटिंग पूर्ण होताच अक्षय कुमारची पोस्ट, फोटो पाहून ओळखणे कठीण!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2024 01:00 PM2024-02-02T13:00:57+5:302024-02-02T13:06:26+5:30
अक्षयने काही फोटो शेअर केले आहेत. यात अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफला ओळखणं कठीण झालं आहे.
आगामी चित्रपट 'बडे मियाँ छोटे मियाँ' (Bade Miyan Chote Miyan) ची घोषणा झाल्यापासून याची चर्चा सर्वत्र आहे. या चित्रपटात अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि टायगर श्रॉफ मुख्य भूमिका साकारणार आहेत आणि प्रेक्षक या चित्रपटासाठी चांगलेच उत्सुक आहेत. नुकतंच सिनेमाचं शुटिंग पुर्ण झालं आहे. अक्षय कुमारने पोस्ट करत ही माहिती दिली. यासोबतच अक्षयने काही फोटो शेअर केले आहेत. यात अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफला ओळखणं कठीण झालं आहे.
'बडे मियाँ छोटे मियाँ' सिनेमाच्या टीमचे सर्व कलाकार आणि क्रू गेल्या काही दिवसांपासून जॉर्डनमध्ये शुटिंग करत होते. शुटिंग पुर्ण झाल्यावर टीमने अनोखं सेलिब्रेशन केलं आहे. यावेळी सर्व कलाकारांनी मड बाथ म्हणजेच मातीची अंघोळ केली. अक्षयने याचा एक फोटो शेअर केला आहे. यात अक्षय आणि टायगरसोबत इतरही काही कलाकार दिसत आहेत. फोटोला अक्षयने मजेशीर कॅप्शन दिलं आहे. त्यानं लिहलं, त्याच जुन्या मीम्सचा कंटाळा आलाय. हे घ्या नवं मीम "मड-टेरियल". शेड्युल पुर्ण झाल्यावर आम्ही असं अविस्मरणीय सेलिब्रेशन केलं.
अक्षयच्या या फोटोवर चाहत्यांनी विविध कमेंट केल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर त्यांचा हा फोटो तुफान व्हायरल होत आहेत. यंदा ईदच्या मुहूर्तावर (10 एप्रिल 2024) 'बडे मियाँ छोटे मियाँ' हा सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमात जबरदस्त ॲक्शन सीन्स पाहायला मिळणार आहेत. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत. अली अब्बास जफर दिग्दर्शित या चित्रपटात अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफसह सोनाक्षी सिन्हा, मानुषी छिल्लर यांच्याही भूमिका असणार आहे. त्यामुळे चाहत्यांना या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.