Sushant Singh Rajput Suicide: बॅकग्राऊंड डान्सर ते बॉलिवूड स्टार; सुशांत सिंह राजपूतचा थक्क करणारा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 06:06 AM2020-06-15T06:06:26+5:302020-06-15T07:05:23+5:30

छोट्या पडद्यावर यशस्वी वाटचाल केल्यानंतर सुशांत सिंग राजपूत बॉलिवूडकडे वळला

Background Dancer to Bollywood Star Sushant Singh Rajputs astonishing journey | Sushant Singh Rajput Suicide: बॅकग्राऊंड डान्सर ते बॉलिवूड स्टार; सुशांत सिंह राजपूतचा थक्क करणारा प्रवास

Sushant Singh Rajput Suicide: बॅकग्राऊंड डान्सर ते बॉलिवूड स्टार; सुशांत सिंह राजपूतचा थक्क करणारा प्रवास

googlenewsNext

मुंबई : मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या करणाऱ्या बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने त्याच्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यापासून केली होती. त्यानंतर त्याला रुपेरी पडद्यावर खरी ओळख ‘एम. एस. धोनी द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटातून मिळाली.

बॉलिवूडमधील प्रवास
छोट्या पडद्यावर यशस्वी वाटचाल केल्यानंतर सुशांत सिंग राजपूत बॉलिवूडकडे वळला. २०१३ मध्ये त्याने ‘काय पोछे’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. याच वर्षात त्याचा आणखीन एक चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट म्हणजे ‘शुद्ध देसी रोमांस’. २०१४ मध्ये तो आमीर खानचा सुपरहीट सिनेमा ‘पीके’मध्ये अनुष्का शर्माच्या प्रियकराच्या भूमिकेत झळकला होता. २०१५ मध्ये सुशांत ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बख्शी’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसला होता. सुशांतला सर्वांत जास्त लोकप्रियता मिळाली २०१६मध्ये प्रदर्शित झालेला बायोपिक ‘एम.एस.धोनी द अनटोल्ड स्टोरी’ चित्रपटातून. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या जीवनावर आधारित या चित्रपटात सुशांतने मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती आणि या चित्रपटातील सुशांतच्या कामाचे खूप कौतुक झाले होते. त्यानंतर त्याने ‘राबता’, ‘वेलकम टू न्यूयॉर्क’, ‘केदारनाथ’, ‘सोनचिडिया’ व ‘छिछोरे’ या चित्रपटांत काम केले होते.

‘पवित्र रिश्ता’मधून घराघरांत लोकप्रियता
सुशांतसिंह राजपूतने त्याच्या करिअरची सुरूवात बॅकग्राउंड डान्सरपासून केल्याचं फार कमी लोकांना माहीत आहे. त्याने २००८ मध्ये स्टार प्लस वाहिनीवरील मालिका ‘किस देश में है मेरा दिल’ मधून टेलिव्हिजन इंडस्ट्रीत पदार्पण केले. २०१० मध्ये तो टेलिव्हिजनवरील रिअ‍ॅलिटी शो ‘जरा नचके दिखा’मध्ये झळकला होता. त्याला टेलिव्हिजन इंडस्ट्रीत खरी ओळख मिळाली ती एकता कपूरची मालिका ‘पवित्र रिश्ता’मधून. या मालिकेतील भूमिकेतून तो घराघरांत पोहोचला.

Web Title: Background Dancer to Bollywood Star Sushant Singh Rajputs astonishing journey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.