Baby Johnचं मोशन पोस्टर रिलीज, दमदार अंदाजात दिसला वरुण धवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2024 15:50 IST2024-10-31T15:49:36+5:302024-10-31T15:50:32+5:30
Varun Dhawan : 'बेबी जॉन'चे नवे मोशन पोस्टर समोर आले आहे. पोस्टरमध्ये वरुण धवनचा दमदार अवतार दिसत आहे. यासोबतच निर्मात्यांनी चित्रपटाचा टीझर रिलीज करण्याची घोषणा केली आहे.

Baby Johnचं मोशन पोस्टर रिलीज, दमदार अंदाजात दिसला वरुण धवन
वरुण धवन(Varun Dhawan)च्या आगामी 'बेबी जॉन' (Baby John Movie) या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सुकता आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर निर्मात्यांनी चाहत्यांना एक मोठे सरप्राईज दिले आहे. 'बेबी जॉन'चे नवे मोशन पोस्टर समोर आले आहे. यासोबतच निर्मात्यांनी चित्रपटाच्या टीझरच्या रिलीजची तारीखही जाहीर केली आहे.
'बेबी जॉन'च्या नवीन पोस्टरमध्ये वरुण धवन वेगळ्या अंदाजात पाहायला मिळत आहे. रक्ताने माखलेल्या कुऱ्हाडीत वरूण धवनचा संतप्त अवतार स्पष्ट दिसत आहे. चित्रपटाचे पोस्टर शेअर करत वरुणने सांगितले की, 'बेबी जॉन'चा टीझर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
'बेबी जॉन'चा टीझर थिएटरमध्ये होणार रिलीज
वरुण धवनने लिहिले की, 'तुम्ही तयार आहात का?, 'बेबी जॉन' एक्सक्लुझिव्ह, 'बेबी जॉन' टेस्टर कट, फक्त १ नोव्हेंबरपासून थिएटरमध्ये पाहायला विसरू नका.' १ नोव्हेंबरला 'सिंघम अगेन' आणि कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया ३' हे दोन मोठे चित्रपट प्रदर्शित होत आहेत. वरुण धवनच्या पोस्टवरून हे स्पष्ट झाले आहे की या चित्रपटांसोबतच 'बेबी जॉन'चा टीझरही दाखवण्यात येणार आहे, ज्याला निर्मात्यांनी टेस्टर कट असे नाव दिले आहे.
वर्कफ्रंट
वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, वरुण धवन अखेरचा श्रद्धा कपूर आणि राजकुमार रावचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'स्त्री २' मध्ये दिसला होता. या चित्रपटात त्याचा कॅमिओ होता ज्यामध्ये तो लांडग्याच्या रुपात दिसला होता. सध्या तो त्याच्या 'सिटाडेल-हनी बनी' या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. त्याची सामंथा प्रभूसोबतची मालिका प्राइम व्हिडिओवर ७ नोव्हेंबरपासून स्ट्रीम होईल. तर 'बेबी जॉन' ख्रिसमसच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात दाखल होणार आहे.