मजूराचा मुलगा असा झाला करोडपती, त्याचे व्हिडिओ पाहून अमिताभ बच्चन व हृतिक रोशनदेखील झाले फॅन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 17:13 IST2020-06-09T17:12:28+5:302020-06-09T17:13:06+5:30

बाबा जॅक्सनचे व्हिडिओ बॉलिवूडच्या सेलिब्रेटींनी सोशल मीडियावर शेअर करत त्याचे कौतूक केले.

Baba Jackson became a millionaire, Amitabh Bachchan and Hrithik Roshan also became fans after watching his videos | मजूराचा मुलगा असा झाला करोडपती, त्याचे व्हिडिओ पाहून अमिताभ बच्चन व हृतिक रोशनदेखील झाले फॅन 

मजूराचा मुलगा असा झाला करोडपती, त्याचे व्हिडिओ पाहून अमिताभ बच्चन व हृतिक रोशनदेखील झाले फॅन 

 

फ्लिपकार्टचे एण्टरटेनर नंबर वन स्पर्धा जिंकणारा टिक टॉक स्टार बाबा जॅक्सन उर्फ युवराज सध्या चर्चेत आला आहे. ही स्पर्धा जिंकल्यामुळे तो प्रसिद्ध झाला आहे, असे नाही. तो आधीपासूनच सोशल मीडियावरील प्रचलित नाव आहे. इतकंच नाही तर अमिताभ बच्चन, हृतिक रोशन व टायगर श्रॉफ या मोठ्या कलाकारांनीदेखील त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.


युवराजचे वडील एक मजूर आहेत आणि घरांमध्ये टाइल्स लावायचे काम करतात. लॉकडाउनदरम्यान फ्लिपकार्टने एण्टरटेनर नंबर वन स्पर्धा सुरु केली होती. ज्यात प्रत्येक आठवड्याला एका विजेत्या दहा लाख रुपये बक्षीस आणि मेगा विनरला एक कोटी रुपये बक्षीस दिले जाणार होते.


जोधपूर राजस्थानमधील युवराज सिंग असून तो जॅक्सन बाबा म्हणून ओळखला जातो. टिक टॉकवर युवराजचे दहा लाखांहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.


आज तकच्या रिपोर्टनुसार युवराजने सांगितले की त्याचे वडील मजूर आहेत आणि ते घरात टाइल्स लावतात.
युवराजने सांगितले की, मला कुणी डान्स करायला शिकविले नाही. एक सिनेमा रिलीज झाला होता मुन्ना माइकल. मी त्याला पाहून डान्स करायला सुरू केले. प्रभूदेवा माझे प्रेरणास्थान आहे. मी जे काही करतो आहे ते शिकायला मला फक्त पाच महिने लागले. 

अमिताभ बच्चनहृतिक रोशन यांनी युवराजचा व्हिडिओ शेअर करत सांगितले की, मला विश्वासच बसत नाही. इतके मोठे सेलिब्रेटी आहेत ज्यांचे व्हिडिओ आम्ही दुसऱ्यांच्या घरी जाऊन पाहत होतो. आम्ही त्यांना पाहून त्यांच्यासारखे करण्याचा प्रयत्न करत होतो. मी अमिताभ सरांचे आभार मानतो की त्यांनी माझा व्हिडिओ शेअर केला आणि त्यावर कमेंट केली.


युवराजला बालपणापासून बॉक्सिंगची आवड होती. मात्र घरच्या परिस्थितीमुळे सर्व काही सोडावे लागले. आई वडिलांचे स्वप्न त्याने इंजिनीअर बनावे पण काही महिन्यांपासून त्याला डान्सची आवड निर्माण झाली. मायकल जॅक्सन यांना पाहून त्यांच्यासारखा डान्स करण्याचा प्रयत्न करू लागला.



 

Web Title: Baba Jackson became a millionaire, Amitabh Bachchan and Hrithik Roshan also became fans after watching his videos