प्रभासचे संपूर्ण नाव तुम्हाला माहीत आहे का? एका श्वासात नाव घेताना लागेल तुम्हाला दम...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2019 06:00 IST2019-08-29T06:00:00+5:302019-08-29T06:00:02+5:30

द कपिल शर्मा शो या कार्यक्रमामध्ये प्रभासची कपिलने ओळख करून देताना त्याचे संपूर्ण नाव सांगितले. त्याचे खरे नाव हे प्रभास नसून त्याचे खरे नाव हे भलेमोठे आहे.

Baahubali fame prabhas real name? revealed on the kapil sharma show | प्रभासचे संपूर्ण नाव तुम्हाला माहीत आहे का? एका श्वासात नाव घेताना लागेल तुम्हाला दम...

प्रभासचे संपूर्ण नाव तुम्हाला माहीत आहे का? एका श्वासात नाव घेताना लागेल तुम्हाला दम...

ठळक मुद्देप्रभासचे नाव हे वेंकटेश सत्यनारायणा प्रभास राजू उप्पलपत्ति असून त्याचे नाव सांगितल्यानंतर ही पाच वेगवेगळी माणसे नसून एकाच व्यक्तीचे हे नाव असल्याचे कपिलने आवर्जून सांगितले. 

द कपिल शर्मा शो हा प्रेक्षकांचा प्रचंड आवडता कार्यक्रम असून बॉलिवूडमधील मंडळी आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी या कार्यक्रमाला पहिली पसंती देतात. या कार्यक्रमात आजवर बॉलिवूडमधील अनेक कलाकार, गायक, दिग्दर्शक, निर्माते तसेच खेळ जगतातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली आहे. या आठवड्यात या कार्यक्रमात आपल्याला दक्षिणेतील एका सुपरस्टारला पाहायला मिळणार आहे. बाहुबली या चित्रपटाच्या दोन्ही भागांनी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कलेक्शन केले आहे. याच चित्रपटातील नायक प्रभास कपिलच्या शोमध्ये हजेरी लावणार आहे. प्रभास आणि श्रद्धा कपूर द कपिल शर्मा शो मध्ये साहो या त्यांच्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करणार आहेत.

प्रभास आणि श्रद्धा त्यांच्या साहो या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करण्यासोबतच कपिलच्या टीमसोबत खूप धमाल मस्ती करणार आहेत. या कार्यक्रमात प्रभास आणि श्रद्धा त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील मनोरंजक किस्से प्रेक्षकांना सांगताना दिसणार आहेत. तसेच द कपिल शर्मा शो मध्ये विनोदवीर कपिल बाहुबली फेम प्रभास आणि श्रद्धाची थट्टा मस्करी करताना देखील दिसणार आहे.

द कपिल शर्मा शो या कार्यक्रमामध्ये प्रभासची कपिलने ओळख करून देताना त्याचे संपूर्ण नाव सांगितले. त्याचे खरे नाव हे प्रभास नसून त्याचे खरे नाव हे भलेमोठे आहे. त्याचे नाव एका श्वासात घेताना तुम्हाला नक्कीच दम लागले यात काही शंका नाही. त्याचे नाव हे वेंकटेश सत्यनारायणा प्रभास राजू उप्पलपत्ति असून त्याचे नाव सांगितल्यानंतर ही पाच वेगवेगळी माणसे नसून एकाच व्यक्तीचे हे नाव असल्याचे कपिलने आवर्जून सांगितले. 

कपिलने कार्यक्रमाची सुरुवात केल्यानंतर आज आपल्या कार्यक्रमात वेंकटेश सत्यनारायणा प्रभास राजू उप्पलपत्ति येणार असल्याचे सांगितले. ही व्यक्ती कोण हेच उपस्थितांना काही क्षणासाठी कळत नव्हते. पण ही व्यक्ती दुसरे कोणी नसून प्रभास आहे हे कळल्यावर त्याचे चाहते प्रचंड खूश झाले. त्यांनी टाळ्या वाजवत आपल्या लाडक्या अभिनेत्याचे स्वागत केले.

 

Web Title: Baahubali fame prabhas real name? revealed on the kapil sharma show