Good News: 'बाहुबली' स्टार राणा दग्गुबाती होणार बाबा? चाहत्यांना मिळणार का आनंदाची बातमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2022 15:40 IST2022-10-27T15:36:57+5:302022-10-27T15:40:15+5:30
Rana Daggubati: मिहिका आणि राणा यांनी २०२० मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचेही अनेक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.

Good News: 'बाहुबली' स्टार राणा दग्गुबाती होणार बाबा? चाहत्यांना मिळणार का आनंदाची बातमी
'बाहुबली' (Bahubali) या गाजलेल्या चित्रपटातील भल्लाल देव (Bhallala deva) ही भूमिका गाजवणारा अभिनेता म्हणजे राणा दग्गुबाती (Rana Daggubati). आपल्या उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर राणाने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान मिळवलं आहे. त्यामुळे त्याच्याविषयीचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. यामध्येच सध्या त्याची पत्नी मिहिका प्रेग्नंट असल्याची चर्चा आहे. त्यामुळे राणा लवकरच बाबा होणार असं म्हटलं जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, कपल लवकरच ही आनंदाची बातमी चाहत्यांना सांगू शकते.
२०२० मध्ये बांधली लग्नगाठ
मिहिका आणि राणा यांनी २०२० मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचेही अनेक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. राणा दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. सध्या मिहीका बजाज आणि राणा दग्गुबती यांच्या अधिकृत निवेदनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेता राणा डग्गुबतीच्या हातात अनेक प्रोजेक्ट्स आहेत. रिपोर्टनुसार, तो दोन चित्रपटांवर काम करत आहे आणि याशिवाय राणा दग्गुबती 'द जर्नी ऑफ इंडिया' या डॉक्युमेंट्री सीरिजचा दुसरा भाग होस्ट करताना दिसणार आहे.