आयुषमान खुराणाचे लव्ह मेकिंग सीन्स पाहून ताहिरा कश्यप मोडणार होती लग्न, पण..
By गीतांजली | Updated: November 5, 2020 15:44 IST2020-11-05T15:32:54+5:302020-11-05T15:44:34+5:30
दोघांनी प्रत्येक क्षणी एकमेकांची साथ दिली आहे.

आयुषमान खुराणाचे लव्ह मेकिंग सीन्स पाहून ताहिरा कश्यप मोडणार होती लग्न, पण..
आयुषमान खुराणा आणि त्यांची पत्नी ताहिरा कश्यप यांच्या जोडी बॉलिवूडमध्ये पावर कपल म्हणतात. दोघांनी प्रत्येक क्षणी एकमेकांची साथ दिली आहे. ताहिरा जेव्हा कॅन्सरची ट्रिटमेंट घेत होती तेव्हा आयुष्मान त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा होता. बर्याचदा दोघे सोशल मीडियावर एकमेकांवरील प्रेम व्यक्त करत असतात. एकवेळ अशी आली होती की ताहिराला आयुष्मानबरोबर लग्न मोडणार होती.
ताहिरानेच पिंकविला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, आयुषमानने ऑनस्क्रीन किस करणे मला पटलेले नव्हते. मला या गोष्टीचा प्रचंड त्रास होत होता. तुम्ही गरोदर असताना तुमच्या हार्मोन्समध्ये बदल घडत असतात. एक मुलगा खूप छान दिसत आहे आणि तो एका महिलेसोबत रोमान्स करत आहे हेच मला पटत नव्हते. आम्ही तेव्हा दोघेही खूपच तरुण होतो. त्याला माझ्यासाठी वेळ नव्हता आणि ती गोष्ट समजून घेण्याची माझ्यात ताकद नव्हती. आमच्या नात्यात चांगलाच दुरावा आला होता... आम्ही एकमेकांच्या सोबतच नाही आहोत असे वाटत होते.
तो मला फसवत नाहीये याची मला चांगलीच कल्पना होती. पण हे काय सुरू आहे हे मला कळत नव्हते. मी या सगळ्यात अनेकवेळा हार पत्करली होती. पण त्याने हार मानली नव्हती. मात्र तो सुधारत देखील नव्हता. पण आता आमच्या नात्यात चांगलीच परिपक्वता आली आहे.
आयुष्यमानने २०११ मध्ये ताहिरा कश्यपसोबत लग्न केले. त्याआधी ११ वर्षांपासून दोघे एकमेकांना डेट करत होते. ताहिरा १६ वर्षांची होती, तेव्हा दोघांची भेट झाली होती. ताहिराच्या वडिलांना आयुष्यमान खूप आवडायचा. हा मुलगा तुला खूप आनंदी ठेवेन, असे ते आपल्या मुलीला म्हणाले होते. या कपलला एक मुलगा आणि एक मुलगी आहेत.