मध्यरात्री महादेवाच्या दर्शनासाठी पोहोचला आयुषमान खुराना; फोटो शअर करत म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2024 15:55 IST2024-02-24T15:55:07+5:302024-02-24T15:55:28+5:30

आयुषमानने उजैन मधील महाकालाचं दर्शन घेतलं. २३ फेब्रुवारीला रात्री टीमसह आयुषमानने महादेवाचं दर्शन घेतलं आणि पूजा केली.

Ayushmann Khurrana visits mahakal mandir ujjain took blessings shared photo | मध्यरात्री महादेवाच्या दर्शनासाठी पोहोचला आयुषमान खुराना; फोटो शअर करत म्हणाला...

मध्यरात्री महादेवाच्या दर्शनासाठी पोहोचला आयुषमान खुराना; फोटो शअर करत म्हणाला...

आयुषमान खुराणा हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. दमदार अभिनय आणि अपार कष्टाच्या जोरावर आयुषमानने बॉलिवूडमध्ये त्याचं स्थान निर्माण केलं. 'ड्रीम गर्ल', 'विकी डोनर', 'अंधाधुंद', 'बाला', 'बधाई हो', 'आर्टिकल १५' अशा अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये त्याने विविधांगी भूमिका साकारल्या. आयुषमान कायमच चर्चेत असतो. त्याचा चाहता वर्ग मोठा असून सोशल मीडियावर तो चाहत्यांना आयुष्याबाबत अपडेट देत असतो. 

नुकतंच आयुषमानने उजैन मधील महाकालाचं दर्शन घेतलं. भर रात्री आयुषमान उजैनमधील श्री महाकालेश्वर मंदिरात महादेवाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचला. २३ फेब्रुवारीला रात्री टीमसह आयुषमानने महादेवाचं दर्शन घेतलं आणि पूजा केली. आयुषमानसोबत त्याची टीमही महादेवाच्या भक्तीत तल्लीन झाल्याचं पाहायला मिळालं. आयुषमानने त्याचे फोटो इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत. या फोटोत आयुषमान महाकालच्या मंदिरातील नंदीच्या कानात त्याची इच्छा व्यक्त करताना दिसत आहे. 

आयुषमानने मंदिरात चाहत्यांबरोबर सेल्फीदेखील काढले. उजैनमधील श्री महाकालेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे. या मंदिराला अनेक सेलिब्रिटी भेट देत महादेवाच्या दर्शनाला येत असतात. अभिनेत्री जान्हवी कपूरही बॉयफ्रेंड शिखर पहाडियासह महादेवाच्या दर्शनाला आली होती. 

Web Title: Ayushmann Khurrana visits mahakal mandir ujjain took blessings shared photo