"संपूर्ण बॉलिवूड रेंटवर चालतंय...", आयुषमान खुराणाने केली इंडस्ट्रीची पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2024 11:57 IST2024-04-24T11:56:24+5:302024-04-24T11:57:06+5:30

आयुषमानने बॉलिवूडबाबत मोठा खुलासा केला आहे. संपूर्ण बॉलिवूड रेंटवर असल्याचं वक्तव्य आयुषमानने केलं आहे.

Ayushmann Khurrana talk about bollywood said whole bollywood is on rent | "संपूर्ण बॉलिवूड रेंटवर चालतंय...", आयुषमान खुराणाने केली इंडस्ट्रीची पोलखोल

"संपूर्ण बॉलिवूड रेंटवर चालतंय...", आयुषमान खुराणाने केली इंडस्ट्रीची पोलखोल

बॉलिवूड सेलिब्रिटी आणि त्यांचं लाइफस्टाइल हा कायमच चर्चेचा विषय असतो. सेलिब्रिटी त्यांच्या हटके फॅशनमुळे चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असतात. कधी सेलिब्रिटींच्या कपड्यांची तर कधी त्यांच्या स्टाइलची चर्चा रंगलेली पाहायला मिळते. पण, इतक्या कपड्यांचं कलाकार नंतर काय करतात? असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? कलाकारांची अर्धी कमाई यावरच जात असेल, असंच अनेकांना वाटतं. बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराणाने याबाबत पोलखोल केली आहे. 

आयुषमानने बॉलिवूडबाबत मोठा खुलासा केला आहे. संपूर्ण बॉलिवूड रेंटवर असल्याचं वक्तव्य आयुषमानने केलं आहे. एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत आयुषमानने बॉलिवूड कलाकारांच्या लाइफस्टाइलबाबत भाष्य केलं आहे. बॉलिवूड कलाकार एवढ्या महागड्या कपड्यांचं नंतर काय करतात? याबाबतही त्याने खुलासा केला आहे. खरं तर 
 कलाकार हे सगळेच कपडे विकत घेत नाहीत, असं आयुषमानने सांगितलं. 

तो म्हणाला, "पू्र्ण बॉलिवूड रेंटवर आहे. तुम्हाला असं वाटतं का की आम्ही सगळे कपडे विकत घेतो? तर तसं नाही. आम्ही स्टाइलिस्टला कामावर ठेवतो. त्यांच्याकडून आम्ही रेंटवर कपडे घेतो आणि परत करतो. एवढे कपडे आम्ही कुठून आणणार?". आयुषमानने पुढे दिलजीत दोसांझची स्टाइल आवडत असल्याचंही सांगितलं. 

"मला फॅशनबद्दल जास्त माहीत नाही. मला साधी लाइफस्टाइल आवडते. पण, कामामुळे मला वेगवेगळे लूक करावे लागते. माझ्या कामाचा तो भाग आहे. माझा भाऊ अपारशक्तीचा फॅशन सेन्स चांगला आहे. तो हे काम खूप चांगल्याप्रकारे करतो. जेव्हा मी सुरुवातीला अँकरिंग करायचो तेव्हा अपारशक्तीच माझी स्टायलिंग करायचा," असंही पुढे आयुषमान म्हणाला.

Web Title: Ayushmann Khurrana talk about bollywood said whole bollywood is on rent