मुलीच्या गेटअपमध्ये तयार होण्यासाठी आयुषमान खुराणाला लागायचे इतके तास

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2019 19:34 IST2019-09-04T19:33:47+5:302019-09-04T19:34:06+5:30

बॉलिवूडचा अभिनेता आयुषमान खुराना सध्या ड्रीम गर्ल चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे

Ayushmann Khurrana Dream Girl Makeup Video Viral Takes More Than 3 Hours To Become Girl In film | मुलीच्या गेटअपमध्ये तयार होण्यासाठी आयुषमान खुराणाला लागायचे इतके तास

मुलीच्या गेटअपमध्ये तयार होण्यासाठी आयुषमान खुराणाला लागायचे इतके तास

बॉलिवूडचा अभिनेता आयुषमान खुराना सध्या ड्रीम गर्ल चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. या चित्रपटात तो एका मुलीचाही रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्याचे चाहते ड्रीम गर्ल चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहेत. यादरम्यान आता ड्रीम गर्ल चित्रपटाच्या मेकिंगचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत आयुषमान चित्रपटातील मुलीच्या गेटअपसाठी कसा तयार होतो, हे दाखवण्यात आलं आहे.

एक मिनिटं ४५ सेकंदाच्या व्हिडिओमध्ये ड्रीम गर्ल चित्रपटातील काही सीन्स आहेत. या व्हिडिओत आयुषमानचा मेकअप करताना दाखवलं आहे. या व्हिडिओत आयुषमान म्हणतो आहे की, महिलांसारखं तयार होणं खूप मोठं टास्क आहे. मला दाढी करावी लागते. थोडीफार वाढली तरी पुन्हा दाढी करावी लागत होती. साडी आणि मग नकली केस लावावे लागत होते. मला तयार व्हायला साडे तीन तास लागत होते.

या व्हिडिओत चित्रपटातील स्टारकास्ट एकमेकांची मस्करी करताना दिसत आहेत. ड्रीम गर्ल सिनेमात आयुषमान महिला व पुरूष अशा दोन अंदाजात पहायला मिळणार आहे. याबाबत सांगताना आयुषमान म्हणाला की, महिलांच्या आवाजात बोलण्यासाठी खूप मेहनत करावी लागली. स्टुडिओमध्ये महिलांसारखे बोलण्यासाठी अभ्यास करावा लागला आणि मग आवाज रेकॉर्ड केला. 


ड्रीम गर्ल चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आयुषमान कॉल सेंटरमध्ये काम करत असतो. जिथे तो मुलींच्या आवाजात पुरूषांसोबत बोलत असतो. या ट्रेलरमध्ये आयुषमान साडी नेसताना दिसला आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत आयुषमानने सांगितलं होतं की, कोणत्याही अभिनेत्यानं अशी भूमिका केली नसेल. मला वेगवेगळ्या भूमिका साकारायला आवडतात. पहिल्या दिवशी साडी परिधान करताना भीती वाटली. पण जसंजसे शूट करत गेलो तसे सोप्पे होत गेले. मात्र अद्याप मला साडी नेसता येत नाही. 

Web Title: Ayushmann Khurrana Dream Girl Makeup Video Viral Takes More Than 3 Hours To Become Girl In film