धक्कादायक! आयुषमानने पत्नीसाठी घेतला मोठा निर्णय, बॉलिवूडला करणार रामराम?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2019 16:42 IST2019-09-27T16:39:22+5:302019-09-27T16:42:12+5:30

एक अष्टपैलू अभिनेता म्हणून आयुषमान खुराणाकडे पाहिलं जातं. गेल्या दोन वर्षांपासून आयुषमान एका मागोमाग एक हीट सिनेमा बॉलिवूडला देतो आहे.

Ayushmann khurrana announces long break from film | धक्कादायक! आयुषमानने पत्नीसाठी घेतला मोठा निर्णय, बॉलिवूडला करणार रामराम?

धक्कादायक! आयुषमानने पत्नीसाठी घेतला मोठा निर्णय, बॉलिवूडला करणार रामराम?

एक अष्टपैलू अभिनेता म्हणून आयुषमान खुराणाकडे पाहिलं जातं. गेल्या दोन वर्षांपासून आयुषमान एका मागोमाग एक हीट सिनेमा बॉलिवूडला देतो आहे. विक्की डोनर ते ड्रीमगर्ल पर्यंतचा आयुषमानचा हा प्रवास सोपा नव्हता. आयुषामनने प्रेक्षकांच्या मनात त्याची एक वेगळी जागा निर्माण केली आहे.

मात्र आयुषमान आता इंडस्ट्रीमधून ब्रेक घेणार आहे. येत्या नोव्हेंबरपासून सिनेमातून ब्रेक घेऊन आयुषमान कुटुंबीयांसोबत वेळ घालवणार आहे. राजस्थान पत्रिकाच्या रिपोर्टनुसार, आयुषमानचं म्हणणे आहे की सध्या तिची पत्नी ताहिरा आणि मुलांना त्याची जास्त गरज आहे. 


रिपोर्टनुसार, आयुषमान म्हणाला मला नाही माहिती हा ब्रेक कित्ती मोठा असले. कदाचित तो 2 ते 3 महिन्यापेक्षा जास्त मोठा पण असू शकतो. गेल्या वर्षी आणि या वर्षी मी लागोपाठ चार सिनेमांचे शूटिंग केले आहे. माझ्यासाठी हे सगळं खूप कठीण होते. मला कामाला आणि कुटुंबाला एकत्र घेऊन चालायंच आहे.

याच कारणामुळे मी नोव्हेंबरपासून कामातून ब्रेक घेणार आहे. हा वेळ मला कुटुंबीयांना द्यायचा आहे. आयुषमान खुरानाने विकी डोनर चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात त्याने स्पर्म डोनरची भूमिका केली होती.

या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर त्याने बरेली की बर्फी, अंधाधुन, बधाई, शुभ मंगल सावधान, आर्टिकल १५, दम लगा के हईशा या चित्रपटातील दमदार भूमिकेतून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.नुकतीच आयुषमानने शुभ मंगल ज्यादा सावधानचे शूटिंग पूर्ण केले आहे. बालानंतर आयुषमानने एकही सिनेमा साईन केलेल नाही.   

Web Title: Ayushmann khurrana announces long break from film