आओ मिलो सिलो सालो...! आयुष्यमान व अपारशक्तीचा हा व्हिडीओ पाहून तुम्हाला आठवेल तुमचे बालपण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2020 10:38 IST2020-07-06T10:38:02+5:302020-07-06T10:38:21+5:30

Watch Video: हा व्हिडीओ सोशल मीडियावर तो तुफान व्हायरल होतोय.

ayushmann khurrana and aparshakti khurana are playing famous 90s game aao milo shilo shaalo | आओ मिलो सिलो सालो...! आयुष्यमान व अपारशक्तीचा हा व्हिडीओ पाहून तुम्हाला आठवेल तुमचे बालपण

आओ मिलो सिलो सालो...! आयुष्यमान व अपारशक्तीचा हा व्हिडीओ पाहून तुम्हाला आठवेल तुमचे बालपण

ठळक मुद्दे पहिल्या चार तासांत या व्हिडीओला 2 लाखांपेक्षा अधिक व्ह्युज मिळालेत.

बालपणीचा काळ सुखाचा, असे म्हणतात ते उगाच नाही. बालपण म्हटले की आठवते ती मज्जामस्ती, शाळेतल्या गमतीजमती, शिवाय मित्रांसोबतचे, भावंडांसोबतचे भन्नाट खेळ. आयुष्यमान खुराणा व त्याचा भाऊ अपारशक्ती खुराणा यांनीही बालपणी असेच काही खेळ खेळले आहेत. त्यांचा असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत आयुष्यमान व अपारशक्ती लहानपणी खेळत असलेला खेळ खेळताना दिसत आहेत.
या खेळाचे नाव आहे ‘आओ मिलो सिलो सालो’. आयुष्यमान व अपारशक्ती हा खेळ खेळताना पाहून तुम्हालाही मज्जा येईल. याचा  ‘आओ मिलो सिलो सालो’ हा खेळ ऑलम्पिकमध्ये खेळला जात असता तर आम्हा दोघा भावांचे मेडल पक्के असते,’ असे हा व्हिडीओ शेअर करताना अपारशक्तीने लिहिले आहे.

हा व्हिडीओ अपलोड झाल्यानंतर सोशल मीडियावर तो तुफान व्हायरल होतोय. पहिल्या चार तासांत या व्हिडीओला 2 लाखांपेक्षा अधिक व्ह्युज मिळालेत.

आयुष्यमान व अपारशक्ती  या दोघी भावांची जोडी ऑनस्क्रीनही एकत्र दिसलेली आहे. 2019 मध्ये आलेल्या ‘बाला’ या सिनेमात आयुष्यमान लीड रोलमध्ये होता तर अपारशक्ती कॅमिओ रोलमध्ये होता. वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर आयुष्यमानचा ‘गुलाबो सिताबो’ हा सिनेमा अलीकडे ओटीटीवर रिलीज झाला. शूजित सरकार दिग्दर्शित या सिनेमात आयुष्यमान व अमिताभ बच्चन लीड रोलमध्ये दिसले.
अपारशक्तीबद्दल सांगायचे तर तो लवकरच ‘हेलमेट’ या सिनेमात दिसणार आहे.

Web Title: ayushmann khurrana and aparshakti khurana are playing famous 90s game aao milo shilo shaalo