'मला पुन्हा इंडस्ट्रीत यायचं नाही'; दिसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर आयशा टाकियाचं मोठं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 02:00 PM2024-02-19T14:00:14+5:302024-02-19T14:00:47+5:30

Ayesha takia: आयशा टाकियाने घेतली कलाविश्वातून निवृत्ती?

ayesha-takia-hits-back-at-users-who-criticized-her-for-looks-says-get-over-me-not-interested-in-films | 'मला पुन्हा इंडस्ट्रीत यायचं नाही'; दिसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर आयशा टाकियाचं मोठं वक्तव्य

'मला पुन्हा इंडस्ट्रीत यायचं नाही'; दिसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर आयशा टाकियाचं मोठं वक्तव्य

एकेकाळी अनेक सुपरहिट सिनेमा देणारी अभिनेत्री आयशा टाकिया (Ayesha takia) हिचा कलाविश्वातील वावर आता कमी झाला आहे. फार क्वचित प्रसंगी ती एखाद्या प्रोजेक्टमध्ये दिसते. मात्र, ती सातत्याने तिच्या बदललेल्या लूकमुळे चर्चेत येत असते. किंबहुना  तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. यात अलिकडेच आयशाला एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं होतं. मात्र, यावेळी तिच्या बदलेल्या लूकमुळे नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं. या ट्रोलर्सला आता तिने सडेतोड उत्तर दिलं आहे.
आयशाने इन्स्टाग्रामवर एक भली मोठी पोस्ट शेअर करत ट्रोलर्सला उत्तर दिलं आहे. सोबतच इंडस्ट्रीमध्ये कमबॅक करण्याविषयीदेखील भाष्य केलं.

काय आहे आयशाची पोस्ट?

 "मला हे सांगावसं वाटतंय की, दोन दिवसांपूर्वी मी गोव्याला गेले होते. माझ्या कुटुंबात अचानकपणे मेडिकल इमर्जन्सी होती. माझी बहीण रुग्णालयात अॅडमीट होती. त्यातही मला एअरपोर्टवर थांबवलं आणि मला फोटोसाठी पोझ द्यायला सांगितल्या. पण, या सगळ्या प्रकारानंतर मला कळतंय की माझ्या दिसण्यावरुन लोकांनी चर्चा सुरु केली. अनेक नको नको ते प्रश्न उपस्थित केले. आणि, ही चर्चा सुद्धा अशी होती की जणू काही देशात माझ्या दिसण्याशिवाय कोणताही महत्त्वाचा मुद्दा चर्चेसाठी उरला नव्हता", असं आयशा म्हणाली.

पुढे ती म्हणते, "काही लोक त्यांचे घाणेरडे विचार माझ्या माथी मारायचा प्रयत्न करत आहेत. मी कशी दिसली पाहिजे, कशी नाही हे ते ठरवतायेत. प्लीज मला एकटं सोडा यार. माझ्या मागे फिरणं बंद करा. मला सिनेमात आता काही रस राहिलेला नाही. आणि, मला पुन्हा इंडस्ट्रीत यायचं सुद्धा नाही. मी माझ्या आयुष्यात सुखी आहे. आणि छान आयुष्य जगतीये. मला आता लाइमलाइटमध्ये सुद्धा रहायचं नाही. नाही मला ऐशोआरामात रस आहे. मला सिनेमात पुन्हा यायचं नाहीये. त्यामुळे जरा शांत रहा आणि माझी काळजी करणं बंद करा."

याच पोस्टमध्ये तिने ट्रोलर्सलाही एक प्रश्न विचारला आहे. मी १५ वर्षांपूर्वी जशी दिसायचे तशीच आताही दिसावी अशी अपेक्षा लोक करतात. पण, ते कसं शक्य आहे. हा विचार म्हणजे मुर्खपणा आहे नुसता, असं बरंच काही तिने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.  दरम्यान,  आयशाने मॉडलिंगपासून तिच्या करिअरची सुरुवात केली. फाल्गुनी पाठकच्या 'मेरी चुनर उड उड जाए'  या गाण्यामुळे ती रातोरात लोकप्रिय झाली. त्यानंतर ती 'टार्जन: द वंडर कार', 'वॉन्टेंड' या सिनेमांमध्ये झळकली. मात्र, त्यानंतर २०११ मध्ये तिने इंडस्ट्रीमधून काढता पाय घेतला.

Web Title: ayesha-takia-hits-back-at-users-who-criticized-her-for-looks-says-get-over-me-not-interested-in-films

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.