​ ‘ऐ दिल...’चे सेन्सॉर सर्टिफिकेट लीक...हे आहेत कट्स!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2016 14:08 IST2016-10-23T14:08:23+5:302016-10-23T14:08:23+5:30

पाकिस्तानी कलाकारांचा समावेश असलेल्या करण जोहरच्या ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटाला असलेला  मनसेचा विरोध मावळला आणि ‘ऐ दिल...’च्या ...

'Aye Dil ...' sensor certificate leak ... these are cut !! | ​ ‘ऐ दिल...’चे सेन्सॉर सर्टिफिकेट लीक...हे आहेत कट्स!!

​ ‘ऐ दिल...’चे सेन्सॉर सर्टिफिकेट लीक...हे आहेत कट्स!!

किस्तानी कलाकारांचा समावेश असलेल्या करण जोहरच्या ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटाला असलेला  मनसेचा विरोध मावळला आणि ‘ऐ दिल...’च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला. भविष्यात कोणत्याही पाकिस्तानी कलाकाराला चित्रपटात काम देणार नाही, चित्रपट सुरू होण्यापूर्वी भारतीय जवानांंना श्रद्धांजली आणि आर्मी वेल्फेअर फंडात ५ कोटी रुपये जमा करण्याच्या तडजोडीवर ‘ऐ दिल’च्या मार्गातील ‘मुश्किल’ दूर झाली. यामुळे करणने निश्चितपणे सुटकेचा नि:श्वास सोडला. पण कदाचित करणची डोकेदुखी इतक्यावरच संपलेली नाही. सेन्सॉर बोर्डाने करणच्या मार्गात आणखी एक अडचण मांडून ठेवलीच. ही अडचण म्हणजे, सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला दिलेले सर्टिफिकेट अर्थात प्रमाणपत्र. होय, हे प्रमाणपत्र लीक झालयं आणि सोशल मीडियावर व्हायरल झाल आहे. सेन्सॉर बोर्डाने चित्रपटात सुचवलेले कट्स या प्रमाणपत्रात दिसताहेत.
अनुष्काच्या एका ‘स्मूचिंग सीन’मध्ये बोर्डाने ५० टक्के कट सुचवलेतं. ‘किसका ज्यादा हॉट है...’ हा चित्रपटातील संवाद बदलून ‘की कौन ज्यादा हॉट आहे’, असा करण्यात आला आहे.  ‘सरस्वती को दबाओ’ हा अन्य द्विअर्थी संवादही बदलून ‘सरस्वती को छुपाओं’ असा करण्यात आला आहे. ‘उमर में बडी है, एक्सपिरीअन्स भी कमाल का है...’ या संवादासोबतच्या सगळ्या व्हिज्युअल्सला कात्री लावण्यात आली आहे. बोर्डाने सुचवलेले हे कट्स प्रेक्षकांना न कळता झाले असते तर काहीच अडचण नव्हती. पण हे आता ही गोष्ट पे्रक्षकांना कळली म्हटल्यावर त्यांची उत्कंठा काहीशी कमी होण्याची भीती करणला सतावते आहे. त्यामुळे करण सध्या चिंतेत आहे. 
  

Web Title: 'Aye Dil ...' sensor certificate leak ... these are cut !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.