Brahmastraच्या यशानंतर सोमनाथच्या दर्शनासाठी गेला अयान मुखर्जी, रणबीर कपूरसोबत केला शिवाभिषेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2022 18:29 IST2022-09-15T18:07:17+5:302022-09-15T18:29:00+5:30

'ब्रह्मास्त्र'च्या यशानंतर अयान मुखर्जी गुजरातमधील सोमनाथच्या दर्शनासाठी गेला होता. त्याच्यासोबत अभिनेता रणबीर कपूरही होता.

Ayan Mukerji and Ranbir kapoor reached somnath to worship says thanks to everyone for Brahmastra success | Brahmastraच्या यशानंतर सोमनाथच्या दर्शनासाठी गेला अयान मुखर्जी, रणबीर कपूरसोबत केला शिवाभिषेक

Brahmastraच्या यशानंतर सोमनाथच्या दर्शनासाठी गेला अयान मुखर्जी, रणबीर कपूरसोबत केला शिवाभिषेक

अयान मुखर्जी त्याच्या आतापर्यंतच्या बहुप्रतिक्षित प्रोजेक्ट ब्रह्मास्त्र (Brahmastra)च्या यशाने खूप खूश आहे. 'ब्रह्मास्त्र' रिलीज होऊन जवळपास एक आठवडा उलटला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 164.20 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाबद्दल लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत असल्या तरी ते चित्रपटामधील VFX चे जोरदार कौतुक करत आहेत.

सोमनाथ दर्शन 
अयान मुखर्जी गुजरातमधील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या सोमनाथच्या दर्शनासाठी गेला होता.त्याच्यासोबत अभिनेता रणबीर कपूरही होता. चित्रपटाच्या आतापर्यंतच्या यशाबद्दल महादेवचे आभार मानायला गेला होतो. सोमनाथचा फोटो त्याने इन्स्टावर शेअर केला आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे- श्री सोमेश्वराय ज्योतिर्लिडाय महारुद्राय नमः. यावर्षातील माझं हे तिसरं ज्योतिर्लिंग दर्शन आहे. मी स्वत:ला वचन दिले होते की, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मी येथे नक्की येईन. मी इथं येऊ शकलो याचा मला खूप आनंद आहे.

चित्रपटाचे शूटिंग संपल्यानंतर अयान आलिया आणि रणबीरसोबत बाबा विश्वनाथच्या दर्शनासाठी गेले होते. यानंतर, चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी ते उज्जैन महाकालेश्वरला देखील गेले होते, परंतु कायदा आणि सुव्यवस्था बिडल्यानं  केवळ अयान मुखर्जीला दर्शन घेता आलं.

अयानने मानले आभार 
अयान मुखर्जी म्हणतो की, 'ब्रह्मास्त्र पार्ट वन शिव' हा चित्रपट असा अनुभव आहे की मी शब्दात वर्णन करू शकत नाही. आमच्या चित्रपटाने एका आठवड्यात चांगली कामगिरी केली आहे आणि यासाठी ज्यांनी चित्रपट पाहिला त्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो. महादेवांचे आभार मानण्यासाठी आम्ही सोमनाथला आलो आहोत.
 

Web Title: Ayan Mukerji and Ranbir kapoor reached somnath to worship says thanks to everyone for Brahmastra success