बॉलिवूडपासून दूर सलमान खान सध्या शेतात गाळतोय घाम, व्हिडिओने वेधले सर्वांचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2020 14:40 IST2020-07-20T14:40:03+5:302020-07-20T14:40:26+5:30

सलमान खानचा शेतातील व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे.

Away from Bollywood, Salman Khan is currently sweating in the field, the video caught everyone's attention | बॉलिवूडपासून दूर सलमान खान सध्या शेतात गाळतोय घाम, व्हिडिओने वेधले सर्वांचे लक्ष

बॉलिवूडपासून दूर सलमान खान सध्या शेतात गाळतोय घाम, व्हिडिओने वेधले सर्वांचे लक्ष

शूटिंग बंद असल्यामुळे कलाकार वेगवेगळ्या गोष्टी करताना दिसत आहेत. बिझी शेड्युलमुळे ज्या गोष्टी करता येत नव्हत्या, त्या गोष्टी करताना कलाकार दिसत आहेत. यादरम्यान सलमान खानचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर पहायला मिळत आहे. ज्यात तो सध्या सलमान पनवेलमधील त्याच्या फार्महाउसवर वेळ व्यतित करत आहे आणि सध्या शेतात घाम गाळताना दिसते आहे. 

सलमान खानने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेतात काम करतानाचे फोटो शेअर केले होते. त्याच्या या फोटोंची सगळीकडे खूप चर्चा झाली होती. त्यानंतर आता त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये सलमान ट्रॅक्टरने शेत नांगरताना दिसतो आहे.

सलमान खानने आपल्या ऑफिशिअल अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये सलमान खान शेती करताना दिसत आहे. पहिले ट्रॅक्टरच्या मागे नांगर लावून सलमान शेतात नांगरणी करत दिसत आहे. त्यानंतर तो स्वत: ट्रॅक्टरही चालवत आहे. हा व्हिडीओ सलमान खानने 'फार्मिंग', असे कॅप्शन लिहून शेअर केला आहे.

सलमान खानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तो राधे युअर मोस्ट वॉण्टेड भाई चित्रपटाची तयारी करतो आहे. या सिनेमाचे थोडे शूटिंग बाकी आहे. हे शूट आता स्टुडिओत केले जाणार आहे. हे शूट परदेशात होणार होते. या सिनेमाची टीम हिरव्या रंगाच्या स्क्रीनवर हा सिनेमाचे शूटिंग करणार आहे आणि एडिटिंगमध्ये परदेश दाखवले जाईल. 

एक्शन सीक्वेन्स शहरातील एका स्टुडिओत शूट केले जाईल. सिनेमाचे दहा ते बारा दिवसाचे काम बाकी आहे. पुढील महिन्यात उर्वरीत शूटिंगला सुरूवात होण्याची शक्यता आहे.

Web Title: Away from Bollywood, Salman Khan is currently sweating in the field, the video caught everyone's attention