अ‍ॅटिट्यूड लेव्हल हाय हैं! तैमुरच्या 'या' कृतीमुळे नेटकऱ्यांनी दिला करिनाला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2021 17:37 IST2021-09-05T17:36:05+5:302021-09-05T17:37:32+5:30

कलाविश्वातील लोकप्रिय स्टारकिड म्हणून अभिनेता सैफ अली खान आणि करिना कपूर -खान यांच्या लेकाकडे म्हणजेच तैमुरकडे पाहिलं जातं. त्यामुळे ...

Attitude levels are high! Because of Timur's 'Ya' action, netizens advised Kareena | अ‍ॅटिट्यूड लेव्हल हाय हैं! तैमुरच्या 'या' कृतीमुळे नेटकऱ्यांनी दिला करिनाला सल्ला

अ‍ॅटिट्यूड लेव्हल हाय हैं! तैमुरच्या 'या' कृतीमुळे नेटकऱ्यांनी दिला करिनाला सल्ला

ठळक मुद्देछायाचित्रकारांना पाहून संतापला तैमुर

कलाविश्वातील लोकप्रिय स्टारकिड म्हणून अभिनेता सैफ अली खान आणि करिना कपूर-खान यांच्या लेकाकडे म्हणजेच तैमुरकडे पाहिलं जातं. त्यामुळे तैमुरची एक झलक कॅमेरात कैद करण्यासाठी छायाचित्रकार आणि चाहते कायमच उत्सुक असतात. विशेष म्हणजे तैमुरही आता कॅमेरा फ्रेंडली झाला असून छायाचित्रकारांना पाहिल्यावर तो फोटोसाठी वेगवेगळ्या पोझ देताना दिसतो. याच कारणास्तव त्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र, सध्या त्याचा एक असाच व्हिडीओ चर्चेत आला असून अनेकांनी तैमुरच्या वागण्यावर नाराजी व्यक्त केली आहे. सोबतच करिनालादेखील ट्रोल केलं आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये करिना तैमुर आणि जेहसोबत दिसून येत आहे. करिना व तिच्या मुलांना पाहिल्यानंतर छायाचित्रकार या तिघांचे फोटो घेण्यास पुढे सरसावले. मात्र, फोटोग्राफर्सला पाहून तैमुर चांगलाच संतापला आणि त्याने छायाचित्रकारांना वाकुल्या दाखवल्या. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी करिनाला 'तैमुरच्या वागण्याकडे वेळीच लक्ष दे', असा सल्ला दिला आहे.

चर्चेत येत असलेला तैमुरचा हा व्हिडीओ विरल भयानी यांच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. यात काहींनी तैमुरप्रती नाराजी व्यक्ती केली आहे. 'अ‍ॅटिट्यूड लेव्हल हाय हैं', असं काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. तर काही जणांनी त्याला 'मॅनर्सलेस'देखील म्हटलं आहे.

दरम्यान, व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओला ६ लाखांपेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहे. करिनाने अलिकडेच तिच्या दुसऱ्या बाळाला जन्म दिला असून सध्या तैमुरसोबतच या चिमुकल्या बाळाचीही सोशल मीडियावर चर्चा होऊ लागली आहे.
 

Web Title: Attitude levels are high! Because of Timur's 'Ya' action, netizens advised Kareena