या कारणासाठी मोतीचूर चक्कनाचूरच्या चित्रीकरणाआधी काही दिवस अथिया गेली होती भोपाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2019 06:00 IST2019-11-07T06:00:00+5:302019-11-07T06:00:02+5:30

थिया या चित्रपटात अनिता अवस्थी म्हणजेच ॲनी ही भूमिका साकारत असून या भूमिकेसाठी तिने प्रचंड मेहनत घेतली आहे.

athiya shetty had visited bhopal before shoot for Motichoor Chaknachoor movie look | या कारणासाठी मोतीचूर चक्कनाचूरच्या चित्रीकरणाआधी काही दिवस अथिया गेली होती भोपाळला

या कारणासाठी मोतीचूर चक्कनाचूरच्या चित्रीकरणाआधी काही दिवस अथिया गेली होती भोपाळला

ठळक मुद्देया चित्रपटाच्या लूकसाठी अथिया आणि तिच्या स्टायलिस्टने अनेकवेळा भोपाळला भेट दिली. तिथे जाऊन तिने तेथील काही टेलर्सना भेटून हा लूक अधिकाधिक चांगला व्हावा यासाठी त्यांच्यासोबत चर्चा केली.

मोतीचूर चक्कनाचूर या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आल्यानंतर या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटाद्वारे नवाझुद्दीन सिद्दीकी आणि अथिया शेट्टी ही नवीन जोडी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या दोघांच्या जोडीची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आल्यापासून या चित्रपटातील अथियाच्या लूकची चांगलीच चर्चा होत आहे. या चित्रपटात अथिया गावातील एका साध्या मुलीची भूमिका साकारत असून तिचा लूकदेखील त्याचप्रकारे डिझाईन करण्यात आला आहे. अथिया या चित्रपटात अनिता अवस्थी म्हणजेच ॲनी ही भूमिका साकारत असून या भूमिकेसाठी तिने प्रचंड मेहनत घेतली आहे. या भूमिकेसाठी तिने प्रचंड अभ्यास केला असून या भूमिकेतील तिच्या लूकवर देखील या चित्रपटाच्या टीमने मेहनत घेतली आहे. या चित्रपटाच्या लूकसाठी अथिया आणि तिच्या स्टायलिस्टने अनेकवेळा भोपाळला भेट दिली. तिथे जाऊन तिने तेथील काही टेलर्सना भेटून हा लूक अधिकाधिक चांगला व्हावा यासाठी त्यांच्यासोबत चर्चा केली.

तिच्या या लूकबाबत अथिया सांगते, मी पहिल्यांदाच अशी भूमिका साकारत असल्याने या भूमिकेत कोणतीच कमतरता राहू नये यासाठी मी प्रयत्न करत आहे. माझा स्टायलिस्ट दर्शन जलान आणि मी चित्रीकरणाच्या काही दिवस आधी भोपाळला गेलो होतो आणि या चित्रपटातील माझे कपडे शिवण्यासाठी काही ट्रेलरना भेटून आलो. मी एका छोट्या गावातील मुलीप्रमाणे दिसण्यासाठी मी या चित्रपटात जास्तीत जास्त सलवार कमीझ आणि सँडल्स घालणार आहे. 

मोतीचूर चक्कनाचूर या चित्रपटाची निर्मिती वायकॉम 18 स्टुडिओ, वुडपेकर मुव्हीज, राजेश आणि किरण भाटिया यांनी केली असून या चित्रपटात नवनी परिहार, अभिषेक रावत यांच्यादेखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन देबामित्रा बिस्वाल यांनी केले असून हा चित्रपट 15 नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे.

Web Title: athiya shetty had visited bhopal before shoot for Motichoor Chaknachoor movie look