बोंबला,Vicky - Katrina च्या लग्नामुळं जयपूरमध्ये आत्तापासूनच पडला या गोष्टीचा मोठा तुटवडा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 07:34 PM2021-11-12T19:34:43+5:302021-11-12T19:35:07+5:30

कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांच्या लग्नासंदर्भातील छोट्या छोट्या बाबी आता समोर येऊ लागल्या आहेत.

Astonishing, Know why this item is lacking post news of Katrina Kaif And Vicky Kaushal's marriage in Jaipur | बोंबला,Vicky - Katrina च्या लग्नामुळं जयपूरमध्ये आत्तापासूनच पडला या गोष्टीचा मोठा तुटवडा

बोंबला,Vicky - Katrina च्या लग्नामुळं जयपूरमध्ये आत्तापासूनच पडला या गोष्टीचा मोठा तुटवडा

googlenewsNext

ट्रेंडिंग कपल कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांच्या लग्नासाठी आता काही दिवस राहिले आहेत. लग्नाची अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र या लग्नासंदर्भातील छोट्या छोट्या बाबी आता समोर येऊ लागल्या आहेत. या दोघांचे लग्न राजस्थानातील जयपूरमध्ये थाटात पार पडणार आहे. डिसेंबर महिन्यात 7 ते 9 तारखेदरम्यान या दोघांचा विवाहसोहळा पार पडणार असल्याचे बोलले जात आहे. या लग्न सोहळ्याची जयपूरमध्ये जोरदार तयारी सुरू आहे.

अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींना देखील लग्नाचे आमंत्रण पाठवण्यात येणार आहे. कोरोनाचे सगळे नियम पाळत विकी-कतरिनाचा हा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. या लग्नात कोणत्याच गोष्टीची कमी भासू नये यासाठी तयारी जोरदार सुरु आहे. या दोघांचे मॅनेजर यांच्या लग्नासाठी आधीच जयपूरमध्ये पोहचले आहेत.

या दोघांच्या लग्नामुळे आत्तापासूनच जयपुरमध्ये एका गोष्टीचा तुटवडा पडू लागला आहे. मुळात नोव्हेंबर - डिसेंबरमध्ये राजस्थानमध्ये पर्यटकांची गर्दी असते.राजस्थानमध्ये सुट्टी एन्जॉय करण्यासाठी जाणा-या पर्यंटकांनाच याचा फटका बसणार असल्याचे दिसतंय. जयपुरमध्ये असलेल्या कार रेंटल सर्व्हिसकडून सगळ्याच कार सेवा बुक करण्यात आल्या आहेत.मोठ मोठ्या ब्रँडच्या कार आधीच बुक करण्यात आल्या आहेत. लग्न ठिकाणी पाहुणे मंडळींना पोहचण्यासाठी या कार बुक करण्यात आल्या आहेत. एकावेळी मोठ्या प्रमाणात कार बुक झाल्यामुळे पर्यटकांना मात्र कार सेवा उपलब्ध करण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागु शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

इतकंच काय तर भाड्याच्या घरात दोघांचा संसार सुरु होणार आहे.लग्नापूर्वी मुंबईतील जुहू येथे आलिशान फ्लॅट भाड्याने घेतल्याचे समोर आले होते. ज्या बिल्डींगमध्ये विकी कतरिनाने भाड्याने घर घेतले आहे. त्याच बिल्डींगमध्ये अनुष्का शर्मा आणि विराट कोहली देखील राहतात.दोघांनी अजुनपर्यंत त्यांच्या लग्नाविषयी कोणतीच माहिती मीडियाला दिलेली नाही. त्यामुळे समोर येणाऱ्या बातम्यांमध्ये कितपत तथ्य आहे हे तर वेळ आल्यावरच स्पष्ट होईल.
 

Web Title: Astonishing, Know why this item is lacking post news of Katrina Kaif And Vicky Kaushal's marriage in Jaipur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.