#AskSRK: शाहरुख खानकडे चाहत्यानं मागितली 'पठाण'ची दोन फ्री तिकिटं, त्यावर अभिनेत्यानं दिलं मजेशीर उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2023 19:40 IST2023-01-21T19:39:50+5:302023-01-21T19:40:30+5:30

Shahrukh Khan's Pathaan : किंग खान शाहरुखचा 'पठाण' चित्रपट २५ जानेवारीला रिलीज होतो आहे. शाहरुख खान चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करतो आहे.

#AskSRK: Fan asks Shahrukh Khan for two free tickets to 'Pathan', actor gives hilarious reply | #AskSRK: शाहरुख खानकडे चाहत्यानं मागितली 'पठाण'ची दोन फ्री तिकिटं, त्यावर अभिनेत्यानं दिलं मजेशीर उत्तर

#AskSRK: शाहरुख खानकडे चाहत्यानं मागितली 'पठाण'ची दोन फ्री तिकिटं, त्यावर अभिनेत्यानं दिलं मजेशीर उत्तर

किंग खान शाहरुख(Shah Rukh Khan)चा 'पठाण' (Pathaan Movie) चित्रपट २५ जानेवारीला रिलीज होतो आहे. शाहरुख खान चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करतो आहे. हा स्पाय थ्रिलरवर आधारित चित्रपट आहे. दीपिका पादुकोण (Deepika Padukone) शाहरुखसोबत रोमँटिक अंदाजात दिसणार आहे. त्याचबरोबर जॉन अब्राहम यात निगेटिव्ह भूमिका साकारताना दिसणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी केवळ तीन दिवस उरले असून शाहरुख खानचे चाहते खूप उत्सुक आहेत. अनेक ठिकाणी चित्रपटगृहे हाऊसफुल्ल झाली आहेत.

शाहरुख खानच्या चाहत्यांनी पठाण चित्रपटाची आगाऊ तिकिटे आधीच बुक केली आहेत. चाहत्यांची क्रेझ एवढी आहे की एका फॅन पेजने संपूर्ण थिएटर बुक केले आहे. शाहरुख खान बॉक्स ऑफिसवर काय धुमाकूळ घालणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. चित्रपटाच्या रिलीजच्या तीन दिवस आधी, किंग खानने त्याच्या चाहत्यांचे आभार आणि मनोरंजन करण्यासाठी ट्विटरवर #AskSRK सेशन केले.

आस्क मी एनिथिंग सत्रादरम्यान, एका ट्विटर युजरने शाहरुख खानला विचारले की तो पठाणची दोन तिकिटे खरेदी करू शकतो का कारण बुक माय शो अॅप क्रॅश झाला होता आणि त्याला फर्स्ट डे फर्स्ट शो पाहायचा आहे. या प्रश्नाच्या उत्तरात सुपरस्टारने लिहिले, "नाही तिकिट तर तुम्हाला स्वतःला खरेदी करावे लागेल... क्रॅश किंवा नो क्रॅश...". 


या सत्रात त्यांनी चाहत्यांच्या सर्व प्रकारच्या प्रश्नांना उत्तरे दिली. एका चाहत्याने शाहरुखला सांगितले की, त्याला गर्लफ्रेंड नाही, मग तो 'पठाण' बघायला कसा आणि कोणासोबत जाणार. यावर शाहरुखने उत्तर दिले की, आता चित्रपट बघा, गर्लफ्रेंड बनवायला संपूर्ण आयुष्य उरले आहे. एवढेच नाही तर एका चाहत्याने शाहरुख खानला त्याच्या अॅब्सबद्दल विचारले.


वास्तविक शाहरुख खान 'पठाण'मध्ये ८ पॅक अॅब्समध्ये दिसत आहे. अशा परिस्थितीत किंग खानने सांगितले की, तो बनवण्यात त्याने किती मेहनत घेतली आहे. शाहरुखने उत्तर देताना लिहिले की, हे अॅब्स माझ्या कामाचा आणि मेहनतीचा पुरावा आहेत.

याशिवाय एका यूजरने शाहरुख खानला विचारले की, 'पठाण' चित्रपट कसा आहे? म्हणजेच थेट युजरने त्याला चित्रपटाचे रिव्ह्यू विचारला. यावर शाहरुख म्हणाला, "आम्ही निर्माते आहोत, समीक्षक नाही. दोघांचीही कामे वेगळी आहेत. चित्रपट बनवण्याच्या आनंदाला तोड नाही. त्यामुळे चित्रपट कसा असेल हे यावरून समजून घ्या."


शाहरुख खान पठाण व्यतिरिक्त राजकुमार हिराणीच्या डंकीमध्ये काम करणार आहे, ज्यात तापसी पन्नू मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय तो नयनतारा आणि विजय सेतुपतीसोबत अॅटलीज जवान या चित्रपटातही काम करणार आहे.

Web Title: #AskSRK: Fan asks Shahrukh Khan for two free tickets to 'Pathan', actor gives hilarious reply