Richa Chaddha Controversy : रिचाविरोधात प्रसिद्ध निर्मात्याने केली तक्रार, ही तर देशद्रोही...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 10:48 AM2022-11-25T10:48:51+5:302022-11-25T10:50:28+5:30

भारतीय सैनिकांचा अपमान केल्याप्रकरणी रिचा चड्डावर सध्या टीका होत आहे. अभिनेता अक्षय कुमारनेही रिचाच्या त्या ट्विटचा निषेध केला होता. तर आता रिचाच्या अडचणीत वाढ झाली आहे.

ashok-pandit-files-complaint-against-richa-chaddha-at-juhu-police-station-says-antinational | Richa Chaddha Controversy : रिचाविरोधात प्रसिद्ध निर्मात्याने केली तक्रार, ही तर देशद्रोही...

Richa Chaddha Controversy : रिचाविरोधात प्रसिद्ध निर्मात्याने केली तक्रार, ही तर देशद्रोही...

googlenewsNext

Richa Chaddha Controversy : भारतीय सैनिकांचा अपमान केल्याप्रकरणी रिचा चड्डावर सध्या टीका होत आहे. अभिनेता अक्षय कुमारनेही रिचाच्या त्या ट्विटचा निषेध केला होता. तर आता रिचाच्या अडचणीत वाढ झाली आहे. फिल्मनिर्माते अशोक पंडीत यांनी रिचा विरोधात police complaint तक्रार दाखल केली आहे. जुहु पोलिस ठाण्यात त्यांनी तक्रारीचे पत्र दिले आहे. रिचाने जाणुनबुजुन भारतीय सैनिकांचा आणि गलवानच्या शहीदांचा अपमान केला असे त्यांनी यामध्ये नमुद केले आहे. 

Ashok pandit अशोक पंडीत म्हणाले, 'भारतीय नागरिक म्हणून आपले हे कर्तव्य आहे की आपल्या सैनिकांचा अपमान करणाऱ्यांविरोधात तक्रार करावी. सैनिकांचा अपमान हा देशद्रोह समजला जातो. रिचाच्या ट्विटनंतर सर्वजण ज्यारितीने प्रतिक्रिया देत आहेत यावरुन मला वाटले याची दखल घेणं गरजेचं आहे आणि मला तक्रार करणे योग्य वाटले. पोलिस यावर कायदेशीर कारवाई करतील.'

काय होते रिचाचे ट्विट ?
भारतीय सेनेचे कमांडर लेफ्टिनेंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या विधानावर रिचाने प्रतिक्रिया दिली . लेफ्टनंट जनरल म्हणाले, "जर सरकारने आदेश दिला तर पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्यासाठी आम्ही सज्ज आहोत." यावर रिच्चाने एका वाक्यात प्रतिक्रिया दिली . तिने ट्वीट केले, "Galwan says hi", अर्थात गलवान हाय म्हणत आहे. 

Web Title: ashok-pandit-files-complaint-against-richa-chaddha-at-juhu-police-station-says-antinational

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.