"त्याच्याकडे गेलेल्या महिलांनाही जाब विचारा...", अशोक खरात प्रकरणात ममता कुलकर्णीचं धक्कादायक विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 17:49 IST2026-03-26T17:48:40+5:302026-03-26T17:49:24+5:30
नाशिक येथील अशोक खरात प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे. खरात याने अनेक महिलांचा लैंगिक छळ केल्याचा आरोप करण्यात येत आहे. अशोक खरातचे अनेक व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सर्वच स्तरातून या प्रकरणी प्रतिक्रिया येत आहेत. आता बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी हिनेदेखील भोंदू अशोक खरात प्रकरणावर तिचं मत मांडलं आहे.

"त्याच्याकडे गेलेल्या महिलांनाही जाब विचारा...", अशोक खरात प्रकरणात ममता कुलकर्णीचं धक्कादायक विधान
Ashok Kharat Case : नाशिक येथील अशोक खरात प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे. खरात याने अनेक महिलांचा लैंगिक छळ केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी आतापर्यंत सहा गुन्हे दाखल झाले आहेत. एका विद्यार्थीनीचाही छळ केल्याचे उघड झाले आहे. अशोक खरात अनेक राजकीय नेत्यांच्याही संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. अशोक खरातचे अनेक व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सर्वच स्तरातून या प्रकरणी प्रतिक्रिया येत आहेत. आता बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी हिनेदेखील भोंदू अशोक खरात प्रकरणावर तिचं मत मांडलं आहे.
ममता कुलकर्णी टीव्ही ९शी बोलताना म्हणाली, "त्याला भ्रम झालेला आहे की तो अवतार आहे. त्या निर्दोष बायकांना त्याने फसवलं. अशा महिलांच्या पतीने आपल्या बायकोला समजून घेतलं पाहिजे. हे नालायक लोक आहेत. तुम्ही त्या महिलांनाही विचारा. काय माहीत त्यांचाही यात सहभाग असू शकतो. मी तर त्या महिलांना दोषी मानत नाही. त्या निर्दोष आहेत. त्यांना क्षमा असावी. पण त्या साधूकडे ज्योतिषीसाठी गेल्या होत्या की अन्य काही करण्यासाठी गेल्या होत्या? मर्यादा या महिलांना माहीत नव्हती का? तो जर मर्यादा ओलांडत होता तर यांनी त्याला एक लाथ मारून यायला हवी होती. त्याला फटके मारून यायचे. त्याला विचारायचं तुम्ही हे काय करताय?".
"अशोक खरात हा महिलांना पाणी प्यायला द्यायचा. महिलांना जाळ्यात ओढायचा. तो स्वतः सिद्ध पुरुष असल्याचे सांगून महिलांवर अत्याचार करत होता. त्याने पाच नरबळी दिल्याचा संशय आहे. त्याच्या फार्महाऊसवर गोळीबार करण्यात आलेली रिकामी काडतुसे मिळाली आहेत. ती त्याने कुठे वापरली याचाही तपास करायचा आहे", अशी धक्कादायक माहिती नाशिक पोलिसांनी न्यायालयात दिली. दरम्यान, न्यायालयाने सुनावणीअंती खरातला २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.