विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडली अन् आयुष्यभर अविवाहित राहिली बॉलिवूडची ही प्रसिद्ध अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2023 09:42 IST2023-10-02T08:40:16+5:302023-10-02T09:42:55+5:30

या अभिनेत्रीने जगाच्या पाठीवर असंख्य चाहते निर्माण केलेत. पण ख-या आयुष्यात मात्र ती कायम एकटी राहिली.

Asha parekh birthday know unknown facts about her career movies and love story of actress | विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडली अन् आयुष्यभर अविवाहित राहिली बॉलिवूडची ही प्रसिद्ध अभिनेत्री

विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडली अन् आयुष्यभर अविवाहित राहिली बॉलिवूडची ही प्रसिद्ध अभिनेत्री

बॉलिवूडचा एक काळ गाजवणाऱ्या आशा पारेख यांनी चाहत्यांना वेड लावले. त्यांनी स्वबळावर बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. गुजरातच्या महुआ येथे मध्यवर्गीय गुजराती कुटुंबात आशा पारेख यांचा जन्म झाला. आशा पारेख यांनी बॉलिवूडमध्ये अनेक हिट सिनेमे दिले. आज आशा पारेख त्यांचा  वाढदिवस साजरा करत आहे. जगाच्या पाठीवर असंख्य चाहते निर्माण केलेत. पण ख-या आयुष्यात मात्र त्या कायम एकट्या राहिल्या. अखेर असे काय झाले की, आशा पारेख यांनी आजन्म अविवाहित राहणे पसंत केले?

आशा पारेख यांचे मानाल तर लग्न त्यांच्या नशिबातच नव्हते. खुद्द आशा यांनी एका मुलाखतीत याबद्दल सांगितले होते. आशा यशाच्या शिखरावर होत्या. बॉलिवूडची एक दिग्गज हिरोईन अशी त्यांची प्रतीमा होती. या अभिनेत्रीला भेटणे वा तिच्यापर्यंत पोहोचणे सोपे नाही, असेच मानून कदाचित कुणीही आशा यांना लग्नाची मागणी घातली नाही. याचमुळे आशा अविवाहित राहिल्या. पण खरं सांगायचं तर असं नव्हते. आशा यांच्या आयुष्यात एकमेव व्यक्ती आली आणि ती व्यक्ती त्यांच्या आयुष्यातील पहिली आणि शेवटची व्यक्ती ठरली.  याच व्यक्तिमुळे त्या आजन्म अविवाहित राहिल्या.

बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता आमिर खानचे काका आणि दिग्गज निर्माते-दिग्दर्शक नासिर हुसैन यांच्यावर आशा यांचे प्रेम होते. (आज नासिर हुसैन हे या जगात नाहीत.)  नासिर हुसैन यांनी अशा पारिख यांना ‘दिल देके देखो’साठी साईन केले. हा चित्रपट हिट झाला अन् आशा पारेख रातोरात स्टार झाल्यात. यानंतर नासिर हुसैन यांनी आशा यांना आपल्या सहा चित्रपटांसाठी साईन केले होते. 

आशा व नासिर हुसैन यांचे दीर्घकाळ अफेअर होते. पण दोघांचे लग्न होऊ शकले नाही. आशा प्रेमात पडल्या त्यावेळी नासिर साहेब विवाहित होते. नासिर यांनी संसार मोडून आपल्याशी लग्न करावे, हे आशा यांना मान्य नव्हते. त्याचमुळे दोघांनी लग्न केले नाही. पुढे आशा यांनी कधीच लग्न केले नाही. आशा पारेख यांच्या द हिट गर्ल या ऑटोबायग्राफीत देखील या गोष्टीचा उल्लेख करण्यात आला आहे. 

Web Title: Asha parekh birthday know unknown facts about her career movies and love story of actress