आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये ७ मोठे स्टार्स कॅमिओ करणार, कोण आहेत ते?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 17:12 IST2025-08-21T17:10:51+5:302025-08-21T17:12:52+5:30
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये सलमान, शाहरुखसह 'हे' कलाकार दिसणार

आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये ७ मोठे स्टार्स कॅमिओ करणार, कोण आहेत ते?
बॉलिवूडचा किंग खान शाहरुखचा (Shah Rukh Khan) लाडका लेक आर्यन खानने (Aryan Khan) दिग्दर्शनाच्या जगात आपलं नशीब आजमावलं आहे. आर्यन खानची पहिली-वहिली दिग्दर्शित वेब सीरिज 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' ( Bads Of Bollywood) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या शोचा प्रिव्ह्यू नुकताच पार पडला आणि त्यासोबतच या मालिकेत दिसणाऱ्या कलाकारांची नावंही समोर आली आहेत. या शोमध्ये तब्बल ७ मोठे सेलिब्रिटी खास कॅमिओ करत आहेत, ज्यामुळे ही मालिका ग्लॅमर, ड्रामा आणि अनपेक्षित ट्विस्टनी भरलेली असेल यात शंका नाही. तर ते कलाकर कोण आहेत, याबद्दल जाणून घेऊया.
'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'ची स्टारकास्ट खूप मोठी आहे. यात मुख्य भूमिकेत लक्ष्य लालवानी आणि सहेर बंबा आहेत. याशिवाय बॉबी देओल, राघव जुयाल, मोना सिंग, मनोज पाहवा, मनीष चौधरी, अन्या सिंग, गौतमी कपूर आणि रजत बेदी महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. या सीरिजमध्ये अनेक मोठे सेलिब्रिटी कॅमिओ करताना दिसणार आहेत. यात सलमान खान, रणवीर सिंग, रणबीर कपूर, सारा अली खान, इब्राहिम अली खान आणि करण जोहर यांचा समावेश आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे खुद्द शाहरुख खान या सीरिजच्या शेवटच्या भागात एका खास भूमिकेत दिसणार आहे, ज्यामुळे प्रेक्षकांसाठी ते एक मोठे सरप्राइज असेल.
'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये फिल्म इंडस्ट्रीमधील राजकारण, संघर्ष आणि ग्लॅमरचे जग जवळून दाखवले जाणार आहे. आर्यनचे दिग्दर्शन पाहण्यासाठी उत्सुक असणाऱ्या चाहत्यांना जास्त वाट बघावी लागणार नाही. १८ सप्टेंबर, २०२५ रोजी ही सीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. ही सीरिज रेड चिलीज एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली तयार झाली आहे. आर्यनची आई गौरी खान या सीरिजची निर्माती आहे.